मृत्युंजयाचा आत्मयज्ञ’ या कादंबरीचे उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन

नागपूर :- कादंबरीकार शुभांगी भडभडे यांनी लिहिलेल्या मृत्युंजयाचा आत्मयज्ञ या कादंबरीचे प्रकाशन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज करण्यात आले. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनावर आधारित ही कादंबरी आहे.

प्रकाशन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी डॅा. वि.स.जोग होते. तर कवी अनिल शेंडे आणि संस्कार भारतीचे अखिल भारतीय साहित्य संयोजक आशुतोष अडोणी यांनी यावेळी कादंबरी तसेच स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकला. इंडिया बुक आफ रेकॅार्डने सन्मानित पद्मगंधा प्रतिष्ठानच्या वतीने या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. मृत्युंजयाचा आत्मयज्ञ ही कादंबरी यापूर्वी जयोस्तुते या नावाने हिंदी भाषेत प्रकाशित करण्यात आली आहे.

NewsToday24x7

Next Post

गुरूव्दारा कमिटीच्या मदतीने मृताच्या पार्थिवावर अंन्त्यसंस्कार

Sun May 28 , 2023
– धावत्या रेल्वेतून पडून ट्रक चालकाचा मृत्यू -छत्तीसगढ एक्सप्रेसमधील घटना नागपूर :- धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू झालेल्या ट्रक चालकाच्या पार्थिवावर गुरूव्दारा कमिटीच्या सहकार्याने गंगाबाई घाट येथे अंन्त्यसंस्कार करण्यात आले. नेदरासिंग पुरनसिंग (70), रा. अमृतसर असे मृतकाचे नाव आहे. ही घटना नरखेड रेल्वे स्थानकावर घडली. या प्रकरणी नागपूर लोहमार्ग पोलिसांनी आकस्मिक मृत्युची नोंद केली आहे. नेदरासिंग हे ट्रक चालक आहेत. रायपुरला […]

You May Like

Latest News

The Latest News

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com