भर सकाळी कामठी तालुक्यात अवकाळी मुसळधार पाऊस..

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

-मुसळधार पावसाने कामठी तालुक्याला झोडपले

-भर दिवसा दिले रात्रदर्शन

कामठी ता प्र 9:-मागील आठवडा पूर्णपणे उष्णतेच्या लाटेत गेल्यानंतर आज सकाळी 9 वाजता कामठी तालुक्यात अचानक काळे ढग होत भर सकाळी रात्रदर्शन देत वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडला.

या वादळी मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरसदृश्य स्थिती निर्माण होत झाडाच्या फांद्या व झाडे उन्मळून पडले.तर आज मात्र सकाळपासूनच आकाशात ढगांची गर्दी झाली आणि नऊ वाजताच्या सुमारास कामठी तालुक्यातील शहर तसेच ग्रामीण भाग पूर्णपणे कळवंडले. त्यानंतर ढगांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडला.ज्यामुळे पूर्ण तालुका अवघ्या तासाभराच्या मुसळधार पावसात जलमय झाले.ज्यामुळे अवकाळी पावसाचा चांगलाच फटका बसला.शेतीचे बऱ्याच प्रमाणात नुकसान झाल्याचे सांगण्यात येते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

वीज पडून शेतकऱ्यांचा मृत्यू.

Thu May 9 , 2024
संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी कामठी ता प्र 9:- हवामान बदलानुसार आज सकाळी साडेआठ वाजेपासून कामठी तालुक्यात अवकाळी वादळी पावसाला मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली असता दरम्यान कामठी तालुक्यातील जाखेगाव येथे शेतातून घरी पायी पायी परत जात असलेल्या 40 वर्षोय शेतकऱ्याचा सकाळी 10,30 वाजता सुमारास वीज पडल्याने मृत्यू झाला असून मृतक शेतकऱ्याचे नाव रामराव शिवराम आखरे वय 42 वर्षे रा जाखेगाव असे आहे. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com