विनयभंग करणाऱ्या आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल

सावनेर :- दिनांक २६/०५/२०२३ चे ०९/०० वा. दरम्यान फिर्यादीच्या घराजवळ राहणारा आरोपी नामे धर्मेंद्र पुंडलीक बनकर, रा. तेलकामठी कळमेश्वर याने फिर्यादीस एका वर्षा अगोदर मी तुझ्यावर प्रेम करतो असे बोलला असता फिर्यादीने याबाबत आपल्या आई वडीलांना सांगीतल्यावरून आरोपीने त्यांना माफी मागीतली होती. फिर्यादीचा एम. एस. सी. आय. टी. चा क्लास असल्याने फिर्यादी नियमीत वेलेवर आपले आतेभाऊच्या गाडीवर वसुन सावनेर येथे येत असता नमुद आरोपी सुद्धा तिच्या मागे येवून फिर्यादीचे क्लास सुटल्यानंतर फिर्यादी बस स्टॉप येथे बसची वाट पाहत असता आरोपी हा फिर्यादी जवळ येवून म्हणाला की तु बारावीचा निकाल का सांगीतला नाही यावरून तु विचारणार कोण? असे फिर्यादीने म्हटले असता फिर्यादीचे हातातील मिठाईचा डब्बा घेतला व गाडीवर बसण्यास बोलला फिर्यादीने बसण्यास नकार दिला अशाप्रकारे मी तुझ्यावर प्रेम करतो म्हणून फिर्यादीशी जवळीक साधण्याच्या उद्देशाने वेळोवेळी या पद्धतीने पाठलाग केला. सदर प्रकरणी फिर्यादी या रिपोर्टवर पोस्टे सावनेर येथे आरोपी विरूद्ध ३५४ ड भादवी सहकलम १२ पोक्सो कायदया अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. आरोपीला अटक करण्यात आली असून गुन्हयाचा पुढील तपास मसपोनी मोकासे या करीत आहे.

NewsToday24x7

Next Post

मृत्युंजयाचा आत्मयज्ञ’ या कादंबरीचे उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन

Sun May 28 , 2023
नागपूर :- कादंबरीकार शुभांगी भडभडे यांनी लिहिलेल्या मृत्युंजयाचा आत्मयज्ञ या कादंबरीचे प्रकाशन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज करण्यात आले. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनावर आधारित ही कादंबरी आहे. प्रकाशन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी डॅा. वि.स.जोग होते. तर कवी अनिल शेंडे आणि संस्कार भारतीचे अखिल भारतीय साहित्य संयोजक आशुतोष अडोणी यांनी यावेळी कादंबरी तसेच स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकला. इंडिया बुक आफ […]

You May Like

Latest News

The Latest News

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com