नागपूर :- पोलीस ठाणे पारडी हहीत, घर नं. ५९, सुभाष मैदान, मोहरकर वाडी, पारडी, नागपूर येथे राहणारे फिर्यादी अंकलेश रमेश भानुसे, वय ३३ वर्षे, हे आपले राहते घराला कुलूप लावुन परिवारासह बाहेरगावी गेले असता, कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीचे घराचे मुख्य दाराचे कुलूप कोंडा तोडुन, घरात प्रवेश करून, लाकडी आलमारीतुन सोन्याचे दागिने, व रोख ४५,०००/- रू असा एकुण १,७५,०००/- रू या मुद्देमाल चोरून नेला.
याप्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाणे पारडी येथे पोउपनि कोल्हारे ७०२०१०४७४३ यांनी अज्ञात आरोपी विरूध्द कलम ४५४, ४५७, ३८० भा.द.वि. अन्वये गुन्हा नोंद केला आहे. पुढील तपास सुरू आहे.