नागपूर :- पो. ठाणे राणाप्रतापनगर हद्दीत प्लॉ. नं. १४५ / एजी ०१, साई कृपा अपार्टमेंट, सुर्वे नगर, राणाप्रतापनगर नागपुर येथे राहणारे गणेश बाबुलाल पवार, वय ६१ वर्षे हे आपले घराचे मुख्य दाराला कुलूप लावुन परिवारासह बैतुल येथे गेले असता, कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीचे घराची लोखंडी ग्रिल तोडुन, घरात प्रवेश करून बेडरूम मधील लोखंडी आलमारीतुन सोने, चांदीचे दागीने, लिनेवो कंपनीचा लॅपटॉप व नगदी २०,०००/-रू असा एकूण किमती अंदाजे ६३,५००/- रु. मुद्देमाल चोरून नेला.
याप्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पो. ठाणे राणाप्रतापनगर येथे पोहवा. राकेश यांनी अज्ञात आरोपी विरुद्ध कलम ४५४, ४५७, ३८० भादवि. अन्वये गुन्हा नोंदवून आरोपीचा शोध घेत आहे.