पळवून नेणाऱ्या आरोपीविरुध्द गुन्हा दाखल

खापरखेडा :- दिनांक ०८/०५/२०२३ चे रात्री २३/०० वाजता ते ०९/०५/२०२३ सकाळी ०६/०० वाजता दरम्यान पो.स्टे. खापरखेडा ह्यांत फिर्यादीची अल्पवयीन भाची वय १४ वर्षे ही उन्हाळ्याच्या सुट्टयांमध्ये त्यांच्या घरी राहण्यास आली होती. फिर्यादीची अल्पवयीन भाची ही कोणालाही न सांगता परस्पर त्यांचे राहते घर सोडून निघून गेली कोणीतरी अज्ञात इसमाने तिला फुस लावुन फिर्यादीच्या कायदेशीर रखवालीतून पळवून नेले आहे. मुलीचे वर्णन रंग गेहुआ, उंची ५ फुट ५ इंच बांधा मध्यम, चेहरा गोल, अंगात लाल रंगाची टीशर्ट नीळया रंगाचा जीन्स घातलेली.

सदर प्रकरणी फिर्यादी यांच्या रिपोर्टवरून पो.स्टे. खापरखेडा येथे आरोपीविरुध्द कलम ३६३ भादंवि कायद्यान्वये गुन्हा नोंद केला आहे. आरोपीचा शोध मेणे सुरू असून सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पीसे  हे करीत आहे..

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

जपानच्या शिष्टमंडळाने घेतली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट,जपान सरकारतर्फे भेटीचे निमंत्रण

Thu May 11 , 2023
मुंबई :- जपानचे कॉन्सुलेट जनरल डॉ. फुकाहोरी यासूकाटा यांच्या शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सागर निवासस्थानी भेट घेऊन विविध विषयावर चर्चा केली. यावेळी डॉ. यासूकाटा यांनी जपान केंद्र सरकारच्या वतीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जपान भेटीचे निमंत्रण दिले. यावेळी उपमुख्यमंत्री कार्यालयाचे सचिव डॉ. श्रीकर परदेशी, विशेष कार्य अधिकारी कौस्तुभ धवसे, जपानचे कॉन्सुल मोरी रायको, कनेको टोशीहिरो, जपान कॉन्सुलेट जनरलचे राजकीय […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com