अवैध रेतीची चोरटी वाहतुक करणाऱ्या आरोपीतांविरूद्ध गुन्हा नोंद वाहनासह एकूण ३५,२४,०००/- रूपयाचा मुद्देमाल जप्त

– नागपूर ग्रामीण पोलीसांची कारवाई

मौदा :- मौदा येथील स्टाफ पोलीस ठाणे मौदा हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना गोपनीय सूत्रधाराकडून माहीती मिळाली की, भंडारा कडून नागपुरकडे अवैधरीत्या विनापरवाना रेती टिप्पर ट्रक मध्ये लोड करून वाहतूक करीत आहे. अशा खात्रीशीर बातमीवरून रखडीवाला वाय पॉईंट मौदा येथे नाकाबंदी केली असता टिप्पर वाहन क्र. MH 40 CM 1112 यास स्टाफने थांबवून पाहणी केली असता सदर वाहनात एकुण अंदाजे ०६ ब्रास रेती मिळून आल्याने सदर वाहन चालक आरोपी अनिल गंगाराम चौधरी, वय २८ वर्ष, रा. डोंगरगाव ता. कुही जि. नागपुर यास ट्रक मधील रेतीचे रॉयल्टी बाबत विचारणा केली असता रॉयल्टी नसल्याचे सांगितल्याने व सदरची रेती ही चोरीची असल्याची खात्री झाल्याने आरोपीच्या ताब्यातून टिप्पर वाहन क्र. MH 40 CM 1112 किंमती अंदाजे ३५,००,०००/- रू. मध्ये ०६ ब्रास रेती किंमती २४,०००/- रू. असा एकुण ३५,२४,०००/- रुपयाचा मुद्देमाल जप्त करुन नमुद आरोपीविरुद्ध पोलीस ठाणे मौदा येथे अपराध क्र. ४१७/२४ कलम ३७९ भारतीय दंडविधान संहीता-१८६०, सहकलम ४८ (७), ४८(८) महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम १९६६, सहकलम ४, २१ खानी आणि खनीजे (विकास आणि नियमन) अधिनियम १९५७, सहकलम ३ सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान प्रतीबंधक अधिनियम १९८४ अन्वये पोलीस येथे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.

सदरची कार्यवाही ही पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण हर्ष ए. पोद्दार (भापोसे), अपर पोलीस अधीक्षक रमेश धुमाळ, डॉ. संतोष गायकवाड उपविभागिय पोलीस अधीकारी कन्हान, सतिशसिंह राजपुत वरिष्ठ पोलिस निरीक्षक पोलीस ठाणे मौदा यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक मनोज चौधरी, पोलीस हवालदार राजेंद्र गौतम, पोना अजय वाघमारे, पोलीस अंमलदार अतुल निंबार्ते, शुभम ईश्वरकर, आशिष रडके पोलीस ठाणे मौदा नागपूर ग्रामीण यांनी केली

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ड्रॅगन पॅलेस टेम्पल ला सदिच्छा भेट

Mon Apr 8 , 2024
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- नागपूर जिल्ह्याचे उपनगर मानले जाणारे तालुकादर्जा प्राप्त कामठी शहरात असलेले विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस टेम्पल मुळे कामठी शहराचे नाव जगाच्या नकाशात कोरले गेले असून ड्रॅगन पॅलेस टेम्पल ला भेट देण्याची खूप दिवसाची इच्छा आज पूर्णत्वास आली तसेच ड्रॅगन पॅलेस टेम्पल मध्ये असलेली तथागत गौतम बुद्ध यांची चंदनाची मूर्ती ही आकर्षित असून या मूर्तीकडे बघितल्यास शांतीची […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com