नरखेड :- अंतर्गत आठवडी बाजार मोवाड येथील नगर परीषद कॉम्प्लेक्स समोरील रोडवर दिनांक १७/०७/२०२३ चे रात्री १०.३० वा. ते दिनांक १८/०७/२०२३ चे सकाळी ०७.०० वा. दरम्यान कोणीतरी अज्ञात इसमाने कोणत्यातरी अज्ञात कारणावरून आठवडी बाजार मोवाड येथील नगर परीषद कॉम्प्लेक्स समोरील रोडवर मृतक नामे- मुन्नी उर्फ मंजुशा रामदास आमटे वय ५० वर्ष, रा. मोवाड हिला जिवानीशी ठार मारून रोडचे बाजूला असलेल्या सिमेंट नालीचे मधुन आत मध्ये टाकले. सदर प्रकरणी फिर्यादी नामे दिलीप किसना बनाईत, वय ३५ वर्ष, रा. वार्ड नं. १४ मोवाड यांचे रिपोर्टवरुन पो.स्टे. नरखेड येथे आरोपीविरुध्द कलम ३०२, २०१ भादवि अन्वये गुन्हा नोंद केला आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस स्टेशन नरखेड येथील ठाणेदार सहायक पोलीस निरीक्षक क्रिष्णा तिवारी हे करीत आहे..