सोमलवाडा चौकात ‘पौर्णिमा दिवस’ अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

नागपूर :- नागपूर महानगरपालिका आणि ग्रीन व्हिजील फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत असलेल्या पौर्णिमा दिवस अभियानाला बुधवारी (ता.२४) रात्री सोमलवाडा चौकातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. पौर्णिमा दिवस अभियानांतर्गत बुधवारी (ता.२४) सोमलवाडा चौक येथे जनजागृती करण्यात आली. ग्रीन व्हिजिलचे कौस्तभ चैटर्जी, सुरभी जैसवाल, मेहुल कोसूरकर, शीतल चौधरी, बिष्णुदेव यादव, श्रीया जोगे, प्रिया यादव या स्वयंसेवकांनी दुकानदार तसेच नागरिकांना एक तास विद्युत दिवे बंद ठेवण्याचे आवाहन केले व नागरिकांनी देखील त्यास सकारात्मक प्रतिसाद दिला. या अभियानात स्थानिक नागरिकांनी देखील उत्साहाने सहभाग नोंदवून मनपाला सहकार्य केले.

या अभियानात स्थानिक नागरिकांनी देखील उत्साहाने सहभाग नोंदवून मनपाला सहकार्य केले. भोलानाथ सहारे, उपेंद्र वालदे, पप्पू वासवानी, प्रा. फुलदास पाटील, मुकुल राऊत, शर्मिला बरगी आदींची मोठ्या संख्येत उपस्थिती होती.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

शासकीय बालगृह, निरीक्षणगृहातून बालकाचे पलायन

Sat Apr 27 , 2024
यवतमाळ :- मुलांचे शासकीय बालगृह, निरीक्षणगृह येथे नदीम शाह सलीम शाह या बालकास बाल कल्याण समितीच्या आदेशाने दि.20 एप्रिल रोजी दाखल करण्यात आले होता. या बालकाचे दि.23 एप्रिल रोजी बालगृह, निरीक्षणगृह येथून पलायन केले आहे. याबाबत पोलिस स्टेशन अवधुतवाडी येथे एफआयआर दाखल करण्यात आला आहे. बालकाचा यवतमाळ शहरातील वर्दळीच्या ठिकाणी तसेच बस स्टॉप, ट्रॅव्हल पाँईट, आठवडी बाजार मंदीर परिसर इत्यादी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com