फसवणुक करणाऱ्या आरोपीविरूध्द गुन्हा दाखल

कामठी :-पोलीस ठाणे जुनी कामठी हद्‌दीत राहणार्या ३८ वर्षीय महीला फिर्यादी यांनी दिनांक २८.०४.२०२३ रोजी १२.०० वा. चे सुमारास, पोलीस ठाणे ईमामवाडा हद्दीत इंडस बैंक मेडीकल चौक, येथे बँकेचे खाते उघडुन त्या मध्ये ९,००,०००/- रू जमा केले होते. त्यापैकी त्यांनी २,००,०००/- रू व्हीड्राल केले होते. व त्याच दिवशी बँकेतुन तेथील कर्मचाऱ्या मार्फत आपले मोबाईल मध्ये बँकेचे अॅप डाऊनलोड करून घेतले. दिनांक २२.०५.२०२३ रोजी फिर्यादी यांना पैश्याची आवश्यकता असल्याने त्यांनी १,००,०००/- रू काढण्यासाठी बँकेत जवाईसह गेल्या असता त्यांना बँकेतुन माहिती मिळाली की त्यांचे अॅकाउंट मध्ये फक्त ३/-रू जमा आहे. कोणीतरी अज्ञात इसमाने फिर्यादीचे अकाउंट मधुन ६,९९.९९७/- रू परस्पर काढुन फिर्यादीची आर्थिक फसवणुक केली.

याप्रकरणी फिर्यादी यांनी दि. १८.०१.२०२४ रोजी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाणे ईमामवाडा येथे पोउपनि भुजाडे  यांनी आरोपीविरूध्द कलम ४२०, भा.द.वि. अन्वये गुन्हा नोंदविला आहे. पुढील तपास सुरू आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

पोलीस स्टेशन उमरेड येथील WCI, मकरधोकडा येथील RVR कन्स्ट्रक्शन कंपनी येथील लोखंडी प्लेटा चोरी करणाऱ्या आरोपीतांना एकूण १०९५०००/- रू. चे मुद्देमालासह अटक

Sat Jan 20 , 2024
– स्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीणची कारवाई उमरेड :-पोलीस स्टेशन उमरेड अंतर्गत मौजा हेवती शिवार येथे दिनांक १७/०१/२०२४ ने २०.०० वा. ते दि. १८/०१/२०२४ ते १०.०० वा. दरम्यान फिर्यादी नामे- मुकंद गणेशचंद्र सैयहीया यांचे उदासा परिसरात कन्वेयर बनविण्याकरीता लागणारे लोखंडी बेल्टस ३ बाय ५ फुटाच्या लांबी रुंदीच्या वजन प्रत्येकी ४५ किलोच्या ४५ नग प्लेटा प्रत्येकी किंमती अंदाजे १०००/- रू. असा […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!