काटोल :- पोलीस स्टेशन काटोल अंतर्गत डोंगरगाव ०६ कि मी पश्चिम, यातील आरोपी यांनी फिर्यादीशी ओळख – करून एकमेकासोबत फोनवर बोलत होते. फिर्यादीच्या वाढदिवसा निमित्त आरोपीने युके मधुन फिर्यादीसाठी ३५,००,०००/- रू चे गिफ्ट पाठविले, त्या करीता इंडिया मध्ये चार्ज लागते, असे म्हणुन आरोपीने फिर्यादी कडुन दिनांक २४.०२.२०२३ ते १०.०३.२०२३ दरम्यान एका मागे एक असे एकुण २,८३,०००/- ची धोखाधडी करून आरोपीने फिर्यादीची आर्थीक फसवणुक केली.
![](https://newstoday24x7.com/wp-content/uploads/2024/06/BJP-Half-page_page-0001.jpg)
सदर प्रकरणी फिर्यादी नामे सविता सुनिल मोहरीया वय ३५ वर्षे रा. डोंगरगाव ता. काटोल – यांचे रिपोर्टवरून पो स्टे काटोल येथे आरोपी नामे रवि शर्मा विरुद्ध कलम ४२०, भादवि सहकलम ६६(सी) माहीती तंत्रज्ञान अधिनियम २००० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला, सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक लोंदे पो स्टे काटोल करीत आहेत.
![](https://newstoday24x7.com/wp-content/uploads/2024/06/WhatsApp-Image-2024-06-06-at-16.46.34_c08487b5.jpg)