कामठी च्या शासकीय उपजिल्हा रुग्णालयात 20 एप्रिल ला भव्य आरोग्य तपासणी मेळावा

संदीप कांबळे, कामठी
कामठी ता प्र 18-आझादी का अमृत महोत्सव साजरा करण्याचा एक भाग म्हणून १८ एप्रिल ते २२ एप्रिल २०२२ या कालावधीत तालुका स्तरावर आरोग्य मेळावे आयोजित करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने कामठी तालुक्यात दिनांक २० एप्रिल २०२२ रोजी उपजिल्हा रुग्णालय कामठी येथे सकाळी ९.०० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत आरोग्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. या शिबिरात भिषक , शल्य चिकित्सक, बालरोग तज्ञ प्रसूती व स्त्रिरोग तज्ञ, कान, नाक व घसा तज्ञ, दंत चिकित्सक व बधिरीकरण तज्ञ यांची सेवा उपलब्ध होणार आहे. तरी कामठी तालुक्यातील रुग्णांनी सदर आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन कामठी पंचायत समितीचे सभापती उमेश रडके, गट विकास अधिकारी अंशुजा गराटे, वैद्यकीय अधिक्षक डॉ. श्रीमती नयना धुपारे , व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय माने यांनी केले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

श्री हनुमान मंदीर रायनगर कन्हान महाप्रसाद वितरण करून जयंती थाटात साजरी

Mon Apr 18 , 2022
संदीप कांबळे, कामठी कामठी : – श्री हनुमान मंदिर पंचकमेटी जे एन रोड रायनगर कन्हान द्वारे श्री हनुमान मंदीरात भाविकांनी पुजा, अर्चना, दहिकाला, महाआरती करून भव्य महा प्रसाद वितरणाने श्री हनुमान जयंती थाटात साजरी करण्यात आली. कोरोना काळ दोन वर्षानी या वर्षी श्री हनुमान जयंती उत्सव श्री हनुमान मंदिर पंचकमेटी जे एन रोड रायनगर कन्हान द्वारे श्री हनुमान मंदीरात भाविकांनी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com