अवैधरित्या जनावरांची वाहतुक करणा-या आरोपीतांविरूध्द कारवाई

पोलीस स्टेशन पारशिवनी:- अंतर्गत मौजा मेहेंदी शिवार पांडे याचे शेतातील नाल्याजवळ ९ किमी पूर्व येथे दिनांक ४/६/२३ मे १९.४० वा दरम्यान, यातील फिर्यादी हे शासकीय वाहनाने पेट्रोलिंग करीत असतांना मेहंदी शिवार येथे पांडे यांचे शेताजवळील नाल्याजवळ एक पिकअप वाहनाने अवैधरित्या जनावरांची वाहतुक करतांना मिळुन आल्याने त्यांची झडती घेतली असता खालीलप्रमाणे मुद्देमाल मिळुन आला. १) एक पांढ-या रंगाची टाटा कंपनीची योध्दा गाड़ी के एम एच ४४ यु०८०५ अंदाजे कि ५०,०००/- मध्ये दोन काळ्या रंगाचे गोरे प्रत्येकी किमती १०,००० /- रू प्रमाणे एकुण २०,०००/- ३) पाच पांढ-या रंगाचे गोरे प्रत्येकी कि १०,०००/- रू प्रमाणे ५०,०००/- ४) दोन तांबड्या रंगाचे गोरे किंमती १०,०००/- एकूण २०,०००/- रु. असा एकुण ५,९०,०००/- या मुद्देमाल मिळुन आला. तसेच फिर्यादी व स्टॉफ मेहंदी शिवारातील मेहंदी ते डुमरी अण्णामोड रस्त्यावरील पांडे यांचे शेतातील नाल्याजवळ असलेल्या इमरान कुरेशी यांच्या ठियावर गेले असता सदर ठिकाणी फिर्यादीला जुनेद विलाल वल्द मोहम्मद युसुफ वय ३५ वर्ष रा थेरखेडा कामठी हा मिळून आला असता त्यास विचारपुस केली त्याने ईमरान कुरेशी अंदाजे वय ३२ वर्ष रा कामठी यांचे सांगण्यावरून सदर ठियावर वाहनातून जनावरे उतरविणे व साठवणुक करून ठेवणे असे काम करीत असल्याचे सांगितले, तिथे तपासणी केली असता २) पाच पांढ-या रंगाचे बैल प्रत्येकी कि २०,०००/- रू प्रमाणे एकूण १,००,०००/- रू २) चार काळ्या रंगाचे बैल किंमती २०,०००/- रु प्रमाणे एकुण ८०,०००/- रू ३) दोन भुरकट रंगाने बैल प्रत्येक कि २०,०००/- रू प्रमाणे एकुण ४०,०००/- ४) नऊ तांबड्या रंगाने बैल कि २०,०००/- प्रमाणे एकुण १,८०,०००/- ५) दोन पांढ-या रंगाचे गोरे प्रत्येकि कि १०,०००/- रू प्रमाणे कि २०,०००/- ६) चार तांबड्या रंगावे गोरे प्रत्येकी कि १०,०००/- रू प्रमाणे एकुण ४०,०००/- रू असा एकूण ४,६०,०००/- चा माल वरील जप्त गाडी व गाडीतील जनावरे व ठियावरील जनावरे असा एकुण १४,५०,०००/- रू किमतींचा मुद्देमाल मिळुन आला..

सदर प्रकरणी सरकार तर्फे पो शि/ रूपेश राठोड पो स्टे पारशिवनी यांचे रिपोर्टवरून पोस्टे पारशिवनी येथे आरोपी नामे भगवान बाजी कावळे वय २९ रा अंबाळा वार्ड रामटेक २) जुनेद बिलाल मोहम्मद युसुफ वय ३५ वर्ष रा येरखेडा कामठी ३) फरार आरोपी इमराण करेशी वय ३२ वर्ष र कामठी यांचे विरूद्ध कलम ११ (१) (ग) (च) (ज) प्राण्यांना कुरतेने वागविण्याचा प्रती सह कलम ५ (अ) (१) (२) ५(ख) ११ सह क.महा.पो.पो. अधीनियम कलम ११९ सहकलम १०९ ३४ भादवी चा गुन्हा नोंद करण्यात करण्यात आला. सदर गुन्हयाचा पुढील तपास पो हवा / पवार करीत आहेत.

NewsToday24x7

Next Post

घरफोडी करणाऱ्या आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल

Wed Jun 7 , 2023
पोलीस स्टेशन काटोल :- अंतर्गत सुशिला पुरम सावरगाव रोड काटोल ०१ कि मी उत्तर यातील अज्ञात आरोपीने फिर्यादीचे घराचे दरवाजाचे लॉक तोडुन बेडरूम मधील आलमारीचे लॉकर उघडुन त्यातील ११ ग्रॅम वजनाचा सोन्याचा गोफ कि. ३०,०००/- रू., सोन्याची अंगठी वजन ०५ ग्रॅम कि. १२,०००/- रू., पर्स मधील नगदी ३,००० /- रू असा एकूण ४५,०००/- रू चा माल दिनांक ०३/०६/२३ से २०.३० […]

You May Like

Latest News

The Latest News

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com