जबरी चोरी करणाऱ्या आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल

नागपूर :- पो.स्टे. एमआयडीसी बोरीअंतर्गत ०४ कि.मी. अंतरावरील रिलायन्स रेल्वे लाईन पूल MIDC बोरी येथे दि.१९/०५/२०२३ चे १५.२० वा. ते १५.३० वा. सुमारास फिर्यादी नामे- अमित प्यास सुंदरभैया वय ४२ वर्ष रा गांधीबाग जागनाथ रोड नागपुर ता. हिंगणा जि. नागपुर हा मित्रा कडुन नेहमी एमआयडीसी बोरी येथे प्लास्टीक कंपनीतून वारदाना माल विकत घेतो. फिर्यादी हा सिंटेक्स कंपनी मांडवा येथे दारदाना नेण्यासाठी जात असतांना टाकळघाट ने रिलायन्स रेल्वे पुलाच्या खाली यातील फिर्यादी हा आपल्या मोटरसायकल क्र. एम. एच. ३१ डी वाय- ४७७७ ने जात असतांना पुलाखाली अनोळखी इसम अचानक समोर आले त्यातील एका इसमाने फिर्यादीला चाकु दाखवला दुसर्या मुलाने त्याच्या गळ्यावर कटर लावला आणि तिसर्या मुलाने त्याच्या डाव्या खिशातील नगदी ५०,०००/- रू. काढले व चौथा मुलगा हा गाडी घेवून उभा होता दुसर्या नंबरच्या मुलाने टायटनची घडयाळ काढली असा एकुण फिर्यादीच्या जवळुन ५१,५००/- रू मुद्देमाल जबरदस्तीने चोरून नेला. सदर प्रकरणी फिर्यादी यांच्या रिपोर्टवरून पो.स्टे. एमआयडीसी बोरी येथे आरोपीतांविरुध्द कलम ३९२, ३४ भादवि कायद्यान्वये गुन्हा नोंद केला आहे. गुन्हयाचा पुढील तपास सपोनि बोरकुटे पो.स्टे. एमआयडीसी बोरी हे करीत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मुक्त विद्यापीठाच्या कुलगुरुपदी प्रा. संजीव सोनवणे; प्रा. हरे राम त्रिपाठी संस्कृत विद्यापीठाच्या कुलगुरुपदी

Sun May 21 , 2023
पुणे :-सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरु (अतिरिक्त कार्यभार) प्रा. संजीव अर्जुनराव सोनवणे यांची यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच वाराणसी येथील संपूर्णानंद संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. हरे राम त्रिपाठी यांची कविकुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपाल तथा विद्यापीठांचे कुलपती रमेश बैस यांनी प्रा. संजीव सोनवणे व प्रा. हरे राम त्रिपाठी यांची […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!