जबरी चोरी करणाऱ्या आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल

नागपूर :- पो.स्टे. एमआयडीसी बोरीअंतर्गत ०४ कि.मी. अंतरावरील रिलायन्स रेल्वे लाईन पूल MIDC बोरी येथे दि.१९/०५/२०२३ चे १५.२० वा. ते १५.३० वा. सुमारास फिर्यादी नामे- अमित प्यास सुंदरभैया वय ४२ वर्ष रा गांधीबाग जागनाथ रोड नागपुर ता. हिंगणा जि. नागपुर हा मित्रा कडुन नेहमी एमआयडीसी बोरी येथे प्लास्टीक कंपनीतून वारदाना माल विकत घेतो. फिर्यादी हा सिंटेक्स कंपनी मांडवा येथे दारदाना नेण्यासाठी जात असतांना टाकळघाट ने रिलायन्स रेल्वे पुलाच्या खाली यातील फिर्यादी हा आपल्या मोटरसायकल क्र. एम. एच. ३१ डी वाय- ४७७७ ने जात असतांना पुलाखाली अनोळखी इसम अचानक समोर आले त्यातील एका इसमाने फिर्यादीला चाकु दाखवला दुसर्या मुलाने त्याच्या गळ्यावर कटर लावला आणि तिसर्या मुलाने त्याच्या डाव्या खिशातील नगदी ५०,०००/- रू. काढले व चौथा मुलगा हा गाडी घेवून उभा होता दुसर्या नंबरच्या मुलाने टायटनची घडयाळ काढली असा एकुण फिर्यादीच्या जवळुन ५१,५००/- रू मुद्देमाल जबरदस्तीने चोरून नेला. सदर प्रकरणी फिर्यादी यांच्या रिपोर्टवरून पो.स्टे. एमआयडीसी बोरी येथे आरोपीतांविरुध्द कलम ३९२, ३४ भादवि कायद्यान्वये गुन्हा नोंद केला आहे. गुन्हयाचा पुढील तपास सपोनि बोरकुटे पो.स्टे. एमआयडीसी बोरी हे करीत आहे.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com