कोसरे कलार समाजाचा महिला दिन कार्यक्रम उत्साहात

नागपूर :-कोसरे कलार समाज ट्रस्ट नागपूर आणि कोसरे कलार महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने नुकतेच नंदनवन परिसरातील गायत्री शक्तीपीठ येथे जागतिक महिला दिन व होळी मिलन कार्यक्रम पार पडला.

याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उमा शर्मा, स्नेहा रॉय, अ‍ॅड. उषा गुजर, अ‍ॅड. श्वेता जयस्वाल, आर्किटेक्ट वर्षा गणोजे, मंजुलता जयस्वाल, माजी नगरसेविका बिहारे, कोसरे कलार महिला मंडळाच्या अध्यक्षा विना पटले, कोसरे कलार समाजाचे अध्यक्ष फाल्गुन उके व पंडित कृष्णकुमार शास्त्री प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी बालकलाकार अनन्या मानकर व किंजल हरडे यांनी सुंदर नृत्य सादर करुन उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. याशिवाय समाजातील सीमा मानकर, श्वेता मानकर, अर्चना ठलाल, राजश्री सूर्यवंशी, विनिता उके, वैशाली दखणे, कीर्ती हरडे, हर्षल पटले यांनीही समूह नृत्य सादर केले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले. संचालन प्रिया मानकर यांनी केले. तर अर्चना ठलाल यांनी आभार मानले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने समाजातील महिला व पुरुष वर्ग उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गजानन पटले, डॉ. विजय मानकर, सुरेश चौरीवार व इतर समाज बांधवांनी सहकार्य केले.

Email Us for News or Artical - di[email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com