जनावरांची अवैधरीत्या वाहतुक करणाऱ्या आरोपीविरूद्ध गुन्हा नोंद

कळमेश्वर :- पो. स्टे. कळमेश्वर येथील स्टाफ पोस्टे हद्दीत पेट्रोलींग करीत असता मिळालेल्या माहितीनुसार मौजा फेटरी राज नर्सरी चे समोर स्टाफने पोहचुन महेन्द्रा बोलेरो पिकअप गाडी क्र. एम. एच-४९/डी-३१८० बी पाहणी केली असता मागील डाल्यामध्ये एकुण ०९ गोवंश ज्यात ०५ वैल, ०३ गोरे, व ०१ गाय असे असून त्यांच्या तोंडाला व पायाला दोरीने बांधुन, त्यांना चारा पाणी न देता दाटीवाटीने, अपुऱ्या जागेत जनावरांना त्रास होईल अश्या स्थितीत निर्दयतेने गाडीत रचुन ठेवलेले दिसुन आले. सदर पिकअप गाडीबा चालक हा तेथे हजर मिळुन आला नाही. सदर गाडी व त्यामधील एकुण ०९ जिवंत गोवंश जनावरे ज्यातील ०८ बैल व गोरे काळया, लाल, पांढरे रंगाचे यांची प्रत्येकी किंमती १०,००० रू. प्रमाणे ८०,००० रू. तसेच ०१ गिर जातीची लाल रंगाची गाय किंमती ३०,००० रू. असा एकुण १,१०,००० रू. व महेन्द्रा बुलेरो पिकअप क्रमांक एम. एच-४९/डी.-३१८० ही किंमती १,५०,००० रु. असा एकुण २,६०,०००/- रु. चा मुद्देमाल जप्त केला_सदर आरोपीस व जप्त माल ताब्यात घेवुन सदरचे गोवंश जनावरांना पुढील संगोपन व देखभाली करिता जैन गौशाला राउळगाव येथे दाखल करण्यात आले आहे. यातील महेन्द्रा बुलेरो पिकअप क्रमाक एम.एच ४९/ डी-३१८० चा चालक व मालक नामे मोहम्मद माजीद मोहम्मद शावीर, वय ३२ वर्ष रा. लष्करीबाग छोटी मस्जिद जवळ नागपुर याने अपुन्या जागेत जनावरांना त्रास होईल अश्या स्थितीत निर्दयतेने गाडीत रखुन वाहतुक करतांना मिळुन आल्याने, नमूद आरोपीविरूध्द कलम ११ (१) (ड), (इ), (फ) प्राण्यांना निर्दयतेने वागणुक प्रतिबंध अधि. १९६०, सहकलम ५(अ), ९ महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनीयम १९६५ सहकलम ११९ म.पो.का. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. आरोपीचा कळमेश्वर पोलीसांनी शोध घेवुन ताब्यात घेतले. आरोपीस सुचनापत्रावर रिहा करण्यात आले आहे.

सदरची कार्यवाही ही पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण हर्ष ए. पोद्दार (भापोसे), अपर पोलीस अधीक्षक रमेश धुमाळ यांचे मार्गदर्शनाखाली ठाणेदार कळमेश्वर पोलीस निरीक्षक योगेश कामाले, सफौ मनोज गाढवे, पोशि ईम्तीयाज शेख यांनी पार पाडली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

टेमसना,परसाड,शिवणी सेवा सहकारी संस्थेची निवडणूक बिनविरोध

Thu Jun 27 , 2024
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- कामठी तालुक्यातील टेमसना,परसाड व शिवणी सेवा सहकारी संस्थेची निवडणूक जाहीर होऊन 26 जून 2024 ही नामनिर्देशन पत्र सादर करण्याची शेवटची तारीख होती या निवडणुकी करिता शेवटच्या दिवशी निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कामठी यांच्या कार्यालयात शेवटच्या दिवशी टेमसना सेवा सहकारी संस्थेच्या निवडणुकीसाठी एकूण 13 नामनिर्देशन पत्र,परसाड सेवा सहकारी संस्थेच्या निवडणुकीसाठी 12 […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com