संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 20 :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या कामठी बस स्टॅण्ड चौकात एक गाय पायी पायी जात असता अचानक खाली पडून मृत्युमुखी पडल्याची घटना आज सकाळी 9 दरम्यान घडली असुन मृत्यूचे कारण हे विषारी वस्तू खाल्ल्यामुळे झाल्याचे सांगण्यात येते.
या गाईचा मालक कोण होता याचा अजूनही पत्ता लागला नव्हता मात्र सदर घटनेची माहिती मिळताच कामठी नगर परीषदचे स्वास्थ्य कर्मचाऱ्यांनी त्वरित घटनास्थळ गाठून मृत्युमुखी गाईला ताब्यात घेत त्वरित गाईला दफन करण्यात आले.