‘इंडिया’ आघाडीत उभी फूट? ममता बॅनर्जीनंतर ‘आप’नं पंजाबमध्ये घेतली ‘एकला चलो रे’ची भूमिका

नवी दिल्ली :- पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी लोकसभा निवडणुकीला ‘एकला चलो रे’ची भूमिका घेतल्यानं ‘इंडिया’ आघाडीला एकच धक्का बसला आहे. आता पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनीही लोकसभेच्या सर्व जागा लढणार असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे इंडिया आघाडीत फूट पडलीय का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जींनी लोकसभा निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय जाहीर केला. याबद्दल प्रसारमाध्यमाच्या प्रतिनिधीनं भगवंत मान यांना प्रश्न विचारल्यावर ते म्हणाले, “पंजाबमध्ये आम्ही काँग्रेसबरोबर युती करणार नाही. राज्यातील १३ जागांवर आम्हाला यश मिळेल.”

NewsToday24x7

Next Post

महाराष्ट्र तलाठी भरती परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर

Wed Jan 24 , 2024
मुंबई :- राज्यातील बहुचर्चित तलाठी परीक्षेतील उमेदवारांची निवड यादी जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्र महसूल विभागाने तलाठी भरती २०२३ परिक्षेचा अंतिम निकाल जाहीर केला आहे. जे उमेदवार भरती परीक्षेसाठी बसले होते ते mahabhumi.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट दऊन त्यांचे निकाल पाहू शकतात. महाराष्ट्र तलाठ्यांची लेखी परीक्षा ३६ जिल्ह्यांमध्ये ५७ शिफ्टमध्ये पार पडली. १,०४१,७१३, नोंदणीकृत उमेदवारांपैकी ८६४,००० (८३.०३ %) परीक्षेत सहभागी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com