प्राणांकीत अपघात करणाऱ्या आरोपीविरूध्द गुन्हा दाखल

नागपूर :-  वानाडोंगरी, नगर परिषदेचे बाजुला, हिंगणा रोड, एम.आय. डी.सी येथे राहणारे फिर्यादीचे वडील नामे लक्ष्मण किसन ढगे वय ५२ वर्ष हे सकाळी उठुन मॉर्निंग वॉकींग करीता गेले असता पोलीस ठाणे एम.आय.डी.सी हद्दीत मातोश्री कामनापूरे विद्यालय जवळ के.जी. एन चिकन सेंटर समोर, हिंगणा रोड येथे अज्ञात वाहन चालकाने त्याचे ताब्यातील वाहन भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवून फिर्यादीचे वडीलांना धक्का मारून पळून गेला. अपघातामध्ये फिर्यादीचे वडील हे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचाराकरीता मेडीकल हॉस्पीटल येथे नेले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषीत केले.

याप्रकरणी फिर्यादी रवि लक्ष्मण हगे वय ३२ वर्ष यांनी दिलेल्या रिपोर्टवरून पोलीस ठाणे एम.आय.डी.सी. येथे पोउपनि चांदकर यांनी अज्ञात आरोपी वाहन चालकाविरुद्ध कलम ३०४(अ) २७९. भा. दं. बो सहकलम १३४, १७७ मो. वा. का अन्वये गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध घेत आहे. पुढील तपास सुरू आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

राज्यातील 2 हजार 655 अमृत सरोवर स्थळी जागतिक योग दिवस साजरा होणार

Wed Jun 21 , 2023
नागपूर :- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून प्रत्येक जिल्ह्यात 75 अमृत सरोवरांची निर्मीती करण्यात आली. या संकल्पनेंतर्गत राज्यात 2 हजार 655 अमृत सरोवर निर्माण झाले आहे. या अमृत सरोवरां स्थळी बुधवार दिनांक 21 जून रोजी जागतिक योग दिवस साजरा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात सर्व नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन महाराष्ट्र शासनाच्या वतीने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com