पोलिसांच्या आरोग्यहितार्थ शिवराज्य प्रतिष्ठानचे एक पाऊल पुढे.

संदीप कांबळे विशेष प्रतिनिधी 

– जुनी कामठी पोलीस स्टेशन येथव मोफत रोग निदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

कामठी ता प्र 2 :- ‘सद्रक्षणाय-खलनिग्रहनाय’हे ब्रीद बाळगून जनसमान्यांसाठी सदैव तत्पर असणाऱ्या पोलिसांविषयी कृतज्ञता व्यक्त करीत त्यांच्या आरोग्याची काळजी करण्याच्या हेतूने ‘रक्षकांचे रक्षण ‘हि संकल्पना मनात हेरून येथील शिवराज्य प्रतिष्ठान ने एक पाऊल पुढे करीत 1 मे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून जुनी कामठी पोलीस स्टेशन येथे पोलिसांसाठी एक दिवसीय मोफत रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराला पोलिसांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून शेकडो च्या जवळपास पोलिसांनी मोफत रोग निदान शिबिराचा लाभ घेतला.

या शिबिरातून पोलिसांनी हिमोग्लोबिन,रक्तदाब,शुगर,बॉडी देतोक्सीकेशन,अग्नीकर्म ची तपासणी केली. याप्रसंगी जुनी कामठी पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक भिताडे,नवीन कामठी पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक कमलाकर गड्डीमे यासह सहपोलिस कर्मचाऱ्यांनी या मोफत रोग निदान शिबिराचा लाभ घेतला.शिबिराला डॉ नितीन आंबटकर व डॉ कमलेश शर्मा तसेच सह आरोग्य कर्मीच्या चमूने आरोग्य सेवा पुरविली.

शिबिराच्या यशस्वीतेसाठी शिवराज्य प्रतिष्ठान चे शिवभक्त पंकज नालेंद्रवार ,स्वप्नील रथकँटीवार, चंद्रशेखर तुप्पट, अश्विन पारसे, तुषार पारसे,ऋषी नानेट, रोहित टोहणे, सुमित शर्मा, नकुल ढोके, आयुष शेंडे व आदी शिवभक्तांनी मोलाचे परिश्रम घेतले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

अपहृत झालेल्या अल्पवयीन मुलीचा ४८ तासाचे आत घेतला शोध.

Tue May 2 , 2023
– स्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीणची कारवाई नागपूर – एमआयडीसी परीसर, पोस्टे उमरेड हद्दीतून फिर्यादीची अल्पवयीन लहान बहीण ०८ वर्षीय अपहृत अल्पवयीन मुलगी हिला कोणीतरी अज्ञात इसमाने फुस लावून पळवून नेल्याबाबत तक्रार पोलीस ठाणे उमरेड येथे प्राप्त झाली. प्राप्त तक्रारीची दखल घेवून अज्ञात आरोपीविरुध्द पोस्टे उमरेड येथे दि. २५/०४/२०२३ रोजी अप क्र. २५१/२३ कलम ३६३ भादवि. अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com