नागपूर :- पोलीस ठाणे कोराडी हद्दीत सावनेर ते नागपूर हायवे रोडचे बाजुचे सर्विस रोडवर, वि.एम.एन.एल गोडावुन समोर, पांजरा, येथे आरोपी स्वीफ्ट कार क. एम.एच ४० ए.आर ७०४० चा चालक नामे जय घनश्याम भोंगाडे वय २० वर्ष रा. कंभाले टावर, महादुला, कोराडी, नागपूर याने त्याचे ताब्यातील कार नागपूर कडे येतांना भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवून लोखंडी बॅरीकेटला धडक मारल्याने स्वीफ्ट गाडी पलटी होवुन तो स्वतः जखमी झाला तसेच गाडीत बसलेले १) आदीत्य प्रमोद पुन्यपवार वय १९ वर्ष रा. चंद्रपूर, ह.मु बैंक ऑफ महाराष्ट्र जवळ, महादुला, कोराडी, नागपूर २) विक्रम उर्फ आयुष मधुकर गाडे वय १९ वर्ष रा. यशवंत लॉन जवळ, महादुला, कोराडी, नागपूर ३) सुजल मानवटकर वय १९ वर्ष ४) सुजल प्रमोद चव्हाण वय १९ वर्ष दोन्ही रा. झेंडा चौक, महादुला, कोराडी, नागपूर या सर्वांना गंभीर जखमी केले. जखमी क. १) आदीत्य प्रमोद पुन्यपवार २) विक्रम उर्फ आयुष मधुकर गाडे यांना उपचाराकरीता मेयो हॉस्पीटल येथे नेले असता, डॉक्टरांनी तपासुन मृत घोषीत केले, जखमी क. ३ व ४ तसेच आरोपी यांचा उपचार न्यूरॉन हॉस्पीटल, धंतोली येथे सुरू आहे. याप्रकरणी फिर्यादी यश मुरेशकुमार थारवानी वय २७ वर्ष रा. प्लॉट नं. २२, सिंधू सोसायटी, जरीपटका, नागपूर यांनी दिलेल्या सुचनेवरून पोलीस ठाणे कोराडी येथे पोउपनि, ओबांडकर ८६६८७११४८६ यांनी वाहन चालक आरोपीविरूध्द कलम १०६(१), २८१, १२५(अ), १२५ (ब) भा.न्या.संहीता अन्वये गुन्हा दाखल करून, पुढील तपास सुरू आहे.