‘जागर शारदेचा, रंग मेहंदीचा’ 28 ऑक्टोबरपासुन प्रारंभ

– खासदार सांस्‍कृतिक महोत्‍सव समितीचा उपक्रम : ७ नोव्हेंबरपर्यंत ३०० ठिकाणी आयोजन

नागपूर :- शहरात आदिशक्तीच्या जागराचा, गौरवाचा उत्सव म्हणून साजरा होत असलेल्या शारदीय नवरात्रोत्सवाला उद्यापासून (शनिवार, दि. 28 ऑक्टोबर ) प्रारंभ झाला आहे. या निमित्ताने खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीच्या वतीने यंदाही मेहंदीचे रंग भरले जाणार आहेत. शहरातील ३०० ठिकाणांवर ७ नोव्हेंबरपर्यंत ‘जागर शारदेचा, रंग मेहंदीचा’ हा उपक्रम राबविला जाणार आहे.

केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून कला, साहित्य, संस्कृती व परंपरांचा प्रचार-प्रसार होण्यासाठी सण व उत्सवांना ‘सांस्कृतिक रुप’ देण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. नागपूर शहराच्या विविध भागांमध्ये तीनशे स्थळांवर शारदोत्सव मंडळांमध्ये मेहंदी कलाकार महिलांच्या हातावर मेहंदी रेखाटणार आहेत. या उपक्रमाच्या संयोजिका मनिषा काशीकर असून गिनेस बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झालेल्या प्रसिद्ध मेहंदी आर्टिस्ट सुनीता धोटे यांच्या टीमद्वारे मेहंदी रंगविण्यात येणार आहे. ज्योती देवघरे, रेखा निमजे, वर्षा चौधरी, कविता सरदार, सरिता माने, निशा भोयर, अश्विनी जिचकार व नगरसेविका दिव्या धुरडे यांचे या आयोजनासाठी विशेष सहकार्य लाभले आहे. ज्या भागांमध्ये हा कार्यक्रम होणार आहे तेथील शारदोत्सव मंडळांनी व महिलांनी जास्तीत जास्त संख्येने उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन खासदार सांस्कृतिक महोत्सव आयोजन समितीचे अध्येक्ष प्रा. अनिल सोले, उपाध्यक्ष मधूप पांडेय, गौरीशंकर पाराशर, अशोक मानकर, दिलीप जाधव, सचिव जयप्रकाश गुप्ताक, कोषाध्यक्ष प्रा. राजेश बागडी, सदस्य बाळासाहेब कुलकर्णी, हाजी अब्दुगल कादिर, संजय गुळकरी, रेणुका देशकर, सारंग गडकरी, अविनाश घुशे, गुड्डू त्रिवेदी, किशोर पाटील, संदीप गवई, चेतन कायरकर, आशिष वांदिले, भोलानाथ सहारे, नितीन तेलगोटे, मनिषा काशीकर यांनी केले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

Small Barbeque for Foodies...

Mon Oct 30 , 2023
Nagpur – This is a Small Barbeque which is handy and sufficient for Families who wish to barbeque small items like Bhutaa, Baigan, Potato, Tomato, Onion, Paneer, Seak Kababs, Non Veg Items, etc or make Tea, Coffee , General steaming , etc. at home or on picnics . This is Apt for people who are lovers of Food cooked on […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com