कण्वाश्रमाची कार्यकारणी जाहीर, अध्यक्षपदी सारंग गडकरी तर सचिवपदी ॲड. रमण सेनाड

नागपूर :-कण्वाश्रम, महाल, नागपूर ची आमसभा नुकतीच संपन्न झाली या आमसभेमध्ये सर्वानुमते नवीन कार्यकारणीची निवड करण्यात आली. यामध्ये अध्यक्षपदी सारंग गडकरी तर सचिवपदी ॲड. रमण सेनाड यांची नियुक्ती करण्यात आली.

उपाध्यक्षपदी वेदमूर्ती विनायक शास्त्री उपाख्य धुंडीपंत पिंपळापुरे, कोषाध्यक्षपदी वैभव तांबोळी तर सहसचिव पदी प्रकाश धामणकर यांची नियुक्ती करण्यात आली. कार्यकारणी सदस्यांमध्ये वेदमूर्ती अनंतराव धारकर, शेखर चिंचाळकर, पराग मेंढी, डॉ. श्रीकांत पोटे, डॉ. वासुदेवराव भाके, प्रकाशराव उंबरकर, आनंद सालोडकर, मिलिंद देवउपाध्ये, पराग जोशी,  छाया उंबरकर, वीणा सदाचार, भाग्यश्री बुरंगे यांची निवड करण्यात आली.

यापूर्वीची कार्यकारणी व ज्येष्ठांकडून मार्गदर्शन घेऊन कण्वाश्रमाच्या स्थापनेच्या मूळ उद्देशांना वर्तमान परिसशीतीला अनुसरून चांगले प्रकल्प राबविण्याचा संकल्प नवनिर्वाचित अध्यक्ष व सचिवांनी केला आहे.

कार्यसिद्धी व संकल्पसिद्धी साठी निरनिराळ्या समित्या नेमून सर्व बांधवांसोबत चर्चा करून पुढील रूपरेषा ठरविण्यात येईल असेही यावेळी नूतन कार्यरिणीने सांगितले.

मावळत्या कार्यकारिणीचे अध्यक्ष डॉ चंद्रशेखर पाध्ये, सचिव ॲड. सुनील पोटे, डॉ. वासुदेवराव भाके , सु पा. देव व अन्य मान्यवरांनी नवीन कार्यकारणी चे यावेळी स्वागत केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

जलतरण स्पर्धेचे उद्घाटन, खासदार क्रीडा महोत्सव

Sun Jan 21 , 2024
नागपूर :-खासदार क्रीडा महोत्सव महोत्सवांतर्गत शनिवारी (ता.२०) अंबाझरी येथील एनआयटी जलतरण तलाव येथे जलतरण स्पर्धेचे उद्घाटन झाले. याप्रसंगी रितेश गावंडे, प्रशांत उगेमुगे, माजी नगरसेविका वर्षा ठाकरे, स्पर्धेचे कन्वेनर डॉ. संभाजी भोसले, डॉ. जयप्रकाश दुबळे, संजय बाटवे, मनोज तुमसरे आदी उपस्थित होते. उद्घाटन कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. जयप्रकाश दुबळे यांनी आणि संचालन डॉ. संभाजी भोसले यांनी केले.     Follow us on […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com