रोहयोच्या प्राधान्यक्रम याद्या तयार करण्यासाठी मोहिम

यवतमाळ :- महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत ग्रामपंचायत स्तरावर विविध घटकांच्या लाभासाठी लाभार्थ्यांच्या प्राधान्यक्रम याद्या तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी संपुर्ण जिल्हाभर विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत दि.10 ते 12 जुलै दरम्यान सर्व ग्रामपंचायतस्तरावर विशेष ग्रामसभा आयोजित करण्यात आली आहे.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत प्रामुख्याने वैयक्तिक सिंचन विहीरी, जणावरांचा गोठा, कुकूटपालन शेड, फळबाग लागवड, मोहगणी वृक्ष लागवड, रेशीम लागवड, वैयक्तिक शेततळे, ढाळीचे बांध, शेत सपाटीकरण, विहीर पुनर्भरण जलतारा या कामाच्या प्राधान्यक्रम याद्या तयार करण्या करिता जिल्ह्यात दिनांक 1 जुलै ते 31 जुलै या कालावधीत मोहिम राबविण्यात येत आहे.

या मोहिमेंतर्गत दिनांक 10 ते 12 जुलै या कालावधीत जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत स्तरावर विशेष ग्रामसभा आयोजित आयोजन करण्यात आल्या आहे. या ग्रामसभेत घटक निहाय लाभार्थ्यांच्या प्राधान्यक्रम याद्या तयार करण्यात येणार आहे, असे नरेगाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश नाटकर यांनी कळविले आहे.

ग्रामस्थांनी सभेत सहभागी व्हावे – मंदार पत्की

विशेष ग्रामसभेमध्ये ग्रामपंचायतीच्या क्षेत्रात वास्तव्यास असलेल्या सर्व पात्र लाभार्थीं यांची योजनेंतर्गत कामाकरिता प्राधान्यक्रम यादी तयार होणार आहे. ग्रामीण भागातील सर्व नागरीकांनी प्राधान्याने महिलांनी विशेष ग्रामसभेमध्ये सहभागी होऊन योजनेंतर्गत प्राधान्यक्रम याद्यांना मुर्त स्वरुप द्यावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की यांनी केले आहे.

@ फाईल फोटो

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

आमदार प्रवीण दटके यांनी यंत्रमाग धारक तसेच कामगारांच्या विविध समस्या बैठकीदरम्यान मांडल्या

Tue Jul 9 , 2024
मुंबई :- राज्यातील यंत्रमागधारकांच्या समस्या सोडवण्याकरिता मा. वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबई येथे बैठक पार पडली. या बैठकीला यंत्रमाग समितीच्या समितीचा सदस्य म्हणून आमदार प्रवीण दटके यांनी उपस्थित राहून यंत्रमाग धारक तसेच कामगारांच्या विविध समस्या बैठकीदरम्यान मांडल्या. 1. वस्त्रोद्योग विभागाअंतर्गत येणाऱ्या सर्व क्षेत्रातील कामगारांच्या जीवनाला नवसंजीवनी देण्याकरिता वस्त्रोद्योग कामगार आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करावी आणि त्यामाध्यमातून कामगारांच्या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com