हुडकेश्वर पोलिसांची जबरदस्त कारवाई  24 तासांच्या आत आरोपींना अटक एकुण 4 लाख 50 हजारांचा मुद्देमाल जप्त

– दिनेश दमाहे,मुख्य संपादक

नागपुर – हुडकेश्वर पोलीस ठाणे येथे दाखल घरफोडीचे गुन्हयातील आरोपींचा शोध घेत असतांना तपास पथकातील पो.हवा. मनोज नेवारे, पो.स्टे. हुडकेश्वर नागपूर यांना गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की रेकॉर्ड वरील गुन्हेगार 1)सोमेश्वर उर्फ कान्हा मोरेश्वर कान्होलकर, वय 22 वर्षे रा. रा.ठि. भोले बाबा नगर, जुने पो. ठाणेचे मागे, गल्ली नं 03, नागपूर व 2)प्रितम उर्फ चीडी आलोक उईके, वय 22 वर्षे, रा. प्ला.क्र 6, सरस्वती नगर, सिध्दीवीनायक अपार्टमेंट च्या

बाजूला पो.स्टे.हुडकेश्वर नागपूर हे काल पासून दारूमध्ये खुप पैसा उडवित असुन त्यांनी कुठेतरी चोरी केली असल्याची शक्यता असल्याने त्यांची उपयुक्त माहिती प्राप्त करून त्यानां दिनांक 18.01.2022 रोजी अवघा 24 तासाचे आत त्यांना ताब्यात घेवून त्यांचेकडे तपास पथकाच्या मदतीने सखोल चौकशी केली असता त्यांचा नमूद गुन्हयात सहभाग निश्चित झाला त्यांचे जवळून गुन्हयातील चोरी केलेल्या 03 नग पिवळया धातुचे मंगळसुत्र, अंगठी, कानातील वेलव, गोफ,
बांगडया, चपलाकंठी असा एकुण किंमत 4,50,000/- चा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
सदर कारवाई नुरूल हसन पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ क्रं. 4,नागपूर शहर, गणेश बिरादार साो. सहायक पोलीस आयुक्त,अजनी विभाग, नागपूर शहर यांच्या मार्गदर्शनाखाली हुडकेश्वर पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक  सार्थक नेहेते, दुय्यम पोलीस निरीक्षक, चित्तरंजन चांदूरे , तपास पथक प्रमुख सपोनि स्वप्नील भुजबळ, पोहवा. मनोज नेवारे, पोहवा दिपक मोरे, पोहवा. नृसिहं दमाहे, पो.ना. चंद्रशेखर कौरती, पो.अं. सुमित चौधरी,राजेश मोते, राजेश धोपटे, प्रफुल वाघमारे यांनी कामगिरी केलेली आहे.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com