बेल्यात स्वच्छतेचा धडाका !

सरपंच बालपांडे यांचा पुढाकार

बेला : नवनिर्वाचित सरपंच अरुण देवराव बालपांडे यांनी सरपंचपदी विराजमान होताच गावात स्वच्छतेचा धडाका सुरू केला आहे. ग्रामपंचायत व एकता नाट्य सांस्कृतिक मंडळाच्या सहकार्याने दर रविवारी ही स्वच्छता मोहीम बेला गावात राबविण्यात येत आहे.

काल रविवारला ग्रामपंचायत कार्यालयापासून वार्ड क्रं.२ व स्मशानभूमी पर्यंत स्वच्छता करण्यात आली या कामी बालपांडे सह उपसरपंच प्रशांत लांबट, स्वयंसेविका सविता रोडे, ग्रा.पं. सदस्य योगेश गाते ,शालू लांडे, कल्पना पादाडे ,नीतू आत्राम, हेमलता झगडे ,राजू रोडे ,नाजुका धनकासार ,नितीन बालपांडे, संजय पुरके, सुनीता कावळे ,शीला गंधारे, एकता नाट्य मंडळाचे अशोक नकले, सुनील गावंडे, किशोर बानकर, कार्यकर्ते गुलाबराव गलांडे ,गंगाधर मते, किशोर सोनकुसरे ,कमलाकर वाघाडे, महेश गाते, तुकाराम शिंगारे, नामदेव लामपुसे ,मधुकर खातखेडे, संजय मंदे ,दशरथ झगडे, अनुरूप धांडे ,कौशल बालपांडे, व संपूर्ण ग्रामपंचायत कर्मचारी परिश्रम व सहकार्य केले आहे.

प्रतिक्रिया-

जिकडे तिकडे घाणीचे साम्राज्य निर्माण झाले होते. स्वच्छता मिशनमुळेच बेला गावाचा विकास होऊ शकतो. निरोगी नागरिकांमुळे ‘स्वच्छ आनंदी व सुंदर गाव’ घडू शकते. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत मी प्रेरणा घेऊन स्वच्छता मोहिमेला सुरुवात केली आहे. ऐतिहासिक व संतभूमी असणाऱ्या बेलानगरीला गत वैभव मिळविण्यासाठी जनतेने सहकार्य करावे.

अरुण बालपांडे, सरपंच बेला

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

आता पदवीच्या (पदवीधर, आयटीआय,डिप्लोमा) विद्यार्थ्यांनाही मेट्रो तिकिट दरात सवलत

Mon Feb 13 , 2023
महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (नागपूर मेट्रो रेल प्रकल्प) ● सोमवार पासून अंमलबजावनी नागपूर : बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना तिकिट दरात सवलतीनंतर महामेट्रोने आता पदवी, पदविका, आयआयटी अभ्यासक्रम, पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांनाही ३० टक्के सवलतीचा निर्णय घेतला. सोमवार, १३ फेब्रुवारीपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार असल्याने हजारो विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. महा मेट्रोने मागील याच आठड्यात ७ फेब्रुवारीपासून बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना तिकिट दरात ३० टक्के […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com