माळी समाजाचा राज्यस्तरीय उपवर युवक-युवती-पालक परिचय मेळावा संपन्न

“शुभमंगलम” परिचय सुची पुस्तीका 2022 चे विमोचन सोहळा संपन्न.

नागपुर :- क्रांतिजोती माळी विकास संस्था नागपूर द्वारा आयोजित युवक-युवती-पालक परिचय मेळावा व शुभमंगलम परिचय सुची पुस्तीका 2022 विमोचन सोहळा गिता मंदिर सुभाष रोड काॅटन मार्केट येथे नुकत्याच 16 ऑक्टोबर रोजी संपन्न झाला. गोविंद वैराळे अध्यक्ष क्रांतिजोती माळी विकास संस्था नागपूर यांच्या मार्गदर्शनात कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मधुसूदन देशमुख नागपूर महानगराध्यक्ष अ.भा. माळी महासंघ नागपूर, परिचय मेळाव्याचे उद्घाटक सेवानिवृत्त न्यायमूर्ती कीशोर रोही होते. कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष सेवानिवृत्त DYSP कैलास तानकर तसेच कृष्णा खोपडे आमदार (पुर्व नागपूर) अशोक मानकर माजी आमदार, कीशोर कान्हेरे माजी विश्वस्त ना.सू.प्र.प्रा.अरुण पवार अध्यक्ष म फुले शिक्षण संस्था नागपूर अविनाश ठाकरे माजी सभापती स्थायी समिती म.न.पा., रविन्द्र अंबाडकर सचिव म.फुले शिक्षण संस्था प्रगती मानकर क्रांतिज्योती सावित्री शक्तीपीठ अध्यक्षा, रोहीणीताई पाटील वर्धा राष्ट्रीय अध्यक्षा अ.भा. माळी महासंघ प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. परिचय मेळाव्याचे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पुष्पा बनकर, विभा बंड, स्नेहा साखळे, अल्का बनसोड, वृषाली ओम वैराळे, गायत्री भुसारी, महिला आघाडीच्या कार्यकारिणी सदस्य आणि सर्वश्री डॉ.प्रा.विवेक भुसारी, गोविंद तितर, संजय साखळे, गणेश कडुकर, विजय सातोकर, रमेश बोबडे, अंबादास गाडेकर, नामदेव लांजेवार ,बंडू भिवगडे, अरुण ढाकूलकर, अनिल भेदे, नरेंद्र चिचमलकर, प्रदीप मांदाडे, नामदेव शेंडे, अशोक बनसोड, आणि समस्त महाराष्ट्र राज्यातील नोंदणी संपर्क प्रमुख यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे  वसुधा येनकर आणि खापरखेडा येथील डॉ. प्रा. संगीता उमाळे यांनी कार्यक्रमाचे संचालन केले. तर उपस्थितीतांचे आभार अ.भा.माऴी महासंघाचे शिवराम गुरुनूले यांनी मानले.

 

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com