संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- कामठी शहर विकासात्मक दृष्टिकोनातून अजूनही मागासलेले आहे .तेव्हा कामठी शहरातील सर्वसामान्य नागरिकांच्या मागण्या पूर्ण करण्याकडे प्रशासनाचे लक्ष वेधुन घेण्यासाठी कामठी नगर विकास कृती समितीच्या वतीने साखळी उपोषण सुरू आहे. याअंतर्गत अर्धनग्न आंदोलन करण्यात आल्यानंतर आज 22 सप्टेंबर ला भर पावसात लोटांगण घालत भीक मांगो आंदोलन करण्यात आले. या भीक मांगो आंदोलनात सुगत रामटेके, उमेश भोकरे,जितू गेडाम, संघपाल गौरखेडे, राजन बागडे,,गणेश आगाशे,आरजू कांबळे यासह आदी नागरिकानी सहभाग दर्शविला होता.
हे साखळी उपोषण जयस्तंभ चौक व डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसराचे पुनर्रचना करून सौंदर्यीकरण करणे,भूमिगत गटार योजनेतील आर्थिक अनियमितता करणाऱ्या दोषी अधिकाऱ्यावर कारवाही करण्यात यावे,कामठी शहरातून गडप करण्यात आलेले औद्योगिक वसाहतची पुनर्रचना करण्यात यावे,कामठींतील प्रस्तावित क्रीडा संकुलाचे बांधकाम त्वरित पूर्ण करण्यात यावे, कामठी शहरातील वाढत्या लोकसंख्येचा विचार करुन नविन बाजारपेठ राजश्री छत्रपती शाहू महाराज रविवार बाजार सुरू करण्यात यावा.नागपूर जिल्ह्यातील मंजूर वैद्यकीय महाविद्यालय कामठी शहरात प्रस्तावित करावा अथवा येथे 500खाटांचे अत्याधुनिक शासकीय रुग्णालय मंजूर करण्यात यावा कामठी शहरातील शासकीय जमिनीवर शासन प्रशासनामार्फत बालोद्यान निर्माण करण्यात यावे,कामठी शहरातील लीज प्रकरणाचा त्वरित निपटारा करण्यात यावा. कामठी शहरात विभिन्न सार्वजनिक ठिकाणी स्त्रीयाकरिता स्वतंत्र सार्वजनिक शौचालय तयार करण्यात यावे,कामठी शहरातील पत्रकारांसाठी तालुका पत्रकार भवन निर्माण करण्यात यावे,कामठी शहरात सांस्कृतिक आणि कला क्षेत्रातील कलावंतासाठी सांस्कृतिक भवनाची निर्मिती करण्यात यावी या प्रलंबित व रखडलेल्या मागण्यांना पूर्ण करण्यासाठी करण्यात येत आहे .