आता पदवीच्या (पदवीधर, आयटीआय,डिप्लोमा) विद्यार्थ्यांनाही मेट्रो तिकिट दरात सवलत

महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड

(नागपूर मेट्रो रेल प्रकल्प)

● सोमवार पासून अंमलबजावनी

नागपूर : बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना तिकिट दरात सवलतीनंतर महामेट्रोने आता पदवी, पदविका, आयआयटी अभ्यासक्रम, पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांनाही ३० टक्के सवलतीचा निर्णय घेतला. सोमवार, १३ फेब्रुवारीपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार असल्याने हजारो विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

महा मेट्रोने मागील याच आठड्यात ७ फेब्रुवारीपासून बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना तिकिट दरात ३० टक्के सवलत दिली. त्यामुळे विद्यार्थी पुन्हा मेट्रो प्रवासाकडे वळले. त्यामुळे आता महामेट्रोने बारावीच्या पुढे पदवी, पदविका, आयआयटी व पॉलिटेक्निक व इतर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाही ३० टक्के सवलतीचा निर्णय घेतला. मेट्रो स्टेशनवरील तिकिट खिडकीवर महाविद्यालयाचे ओळखपत्र किंवा बोनाफाईड प्रमाणपत्र दाखवून विद्यार्थी ३० टक्के सवलतीच्या दरात तिकिट खरेदी करू शकतील. मेट्रोतून प्रवासासाठी असलेल्या प्रत्येक किमीच्या टप्प्यासाठी ही सवलत राहणार आहे. रोख तसेच महाकार्डचा वापर करणाऱ्यांना या सवलतीचा लाभ घेता येणार आहे. महाकार्डची सेवा देणाऱ्या स्टेट बॅंक ऑफ इंडियाने सॉफ्टवेअरमध्ये नव्या सवलतीनुसार सुधारणा केली असून सोमवारपासून महाकार्डधारकही सवलतीचा लाभ घेऊ शकणार आहे. शाळा, कॉलेजचे ओळखपत्र दाखवून विद्यार्थी स्टेशनवरून महाकार्ड मिळवू शकतील.

७ फेब्रुवारीपासून महाकार्डवर विद्यार्थ्यांनी केलेल्या प्रवासात जुन्याच दराने तिकिट आकारले गेले होते. याचा परतावा ओळखपत्र दाखवल्यानंतर कार्डच्या टॉप-अपमध्ये जमा होईल. कार्ड टॉप-अप करताना ही रक्कम कोणत्या तारखेपासून उपलब्ध होईल, याबाबत लवकरच खुलासा केला जाणार आहे. एसबीआयने कार्ड उपलब्ध करून दिल्यानंतर महामेट्रोद्वारे केवळ विद्यार्थ्यांसाठी वेगळे महाकार्डही तयार केले जाणार आहे. या महाकार्डमध्ये सवलतीचे वैशिष्ट्ये असेल. सध्या महाकार्ड वापरणाऱ्या सर्वांनाच १० टक्के सवलत दिली जात आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

GST ON MIDC LEASED LAND AFFECTING MSMES ALL OVER INDIA – DR DIPEN AGRAWAL, PRESIDENT CAMIT

Mon Feb 13 , 2023
Nagpur :-GST department has put the industry in a state of fear by sending summons and starting investigation on number of transfers of leased lands have taken place in Maharashtra Industries Development Corporation (MIDC) industrial area since July 2017. Dr Dipen Agrawal said that, the department seems to be taking a stand after 5 years since inception of GST that […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com