संदीप कांबळे, कामठी
–प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे कोटी रुपयाची माती चोरीला
कामठी ता प्र 1-कामठी तालुक्यातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात अवैधरित्या मोठ्या प्रमाणात माती उत्खनन सुरू असून या अवैध माती उत्खननातून प्रशासनाच्या कोटी रुपयांचा महसूल बुडाला असून अवैध माती उत्खनन करणाऱ्यांना प्रशासनाचे कुठलेही भय नसल्याने अवैध माती उत्खनन मोठया प्रमाणात सुरू आहे. याच प्रकारातील अवैध माती उत्खनन मुळे दिघोरी गावातील एका 12 वर्षीय मुलाचा डबक्यात पडून दुर्दैवी मृत्यू झाला होता तेव्हा अजून कुण्या बालकाच्या मृत्यूची बळी नंतर प्रशासनाला जाग येणार का?असा प्रश्न जिल्हा परिषद सदस्य दिनेश ढोले यांनी केला आहे.
कामठी तालुक्यांतर्गत येणाऱ्या महालगाव ग्रा प जवळील दिघोरी, आडका, गारला गावाला लागून मागील दीड वर्षांपासून रेल्वे प्रशासनाच्या वतीने नागपूर नागभीड रेल्वे ब्रॉडगेज चे रेल्वे लाईन व उडानपुल बांधकामाचे काम प्रगती पथावर असून या बांधकामाच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या शेताच्या बाजूने अवैध व्यवसायिकांनी माती उत्खनन करण्याची कुठलीही रॉयल्टी न घेता विना परवाना बिनधास्तपणे जेसीबी,पोकलँड चा वापर करून 15ते 20 फूट खोल खड्डे करीत माती उत्खनन करून माती विकल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला असून येथील महसूल प्रशासनाच्या अभयपणामुळे या अवैध व्यवसायिकांनी हजारो पेक्षा अधिक ट्रक माती अवैध उत्खनन करून चोरी केली तर या चोरी प्रकरणातून या अवैध उत्खनन व्यवसायिकांनी अजूनपावेतो जवळ्पास कोटी रुपयांची महसूल चोरी केली आहे.उत्खनन झालेल्या या ठिकाणी नाल्याचे स्वरूप प्राप्त झाले असून पाणी वाहत आहे. मागिल जुलै महिन्यात 12 वर्षीय संजय चौधरी नामक मुलाचा या प्रकारच्या डबक्यात पडून मृत्यू झाल्याची घटना हृदयाला हेलावणारी आहे तरीसुद्धा या प्रकारच्या अवैध उत्खनन प्रकाराला आळा बसू शकला नाही हे एक दुर्दैवच मानावे लागेल तेव्हा अशा परिस्थितीत या अवैध उत्खनन व्यवसायिकांना प्रशासनाचे कुठलेही भय नसल्याने हे अवैध उत्खनन अजून किती लहान मुलाच्या जीवावर बेतणारे ठरनार आहे आणि तेव्हाच प्रशासनाला जाग येईल का?असा सवाल करीत या अवैध उत्खनन प्रकाराला त्वरित आळा बसून आरोपीवर कायदेशीर कारवाही न झाल्यास प्रशासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन पुकारणार असल्याचा ईशारा जि प सदस्य दिनेश ढोले यांनी केला आहे.
कामठी तालुक्यातील ग्रामीण भागात अवैध माती उत्खनन जोमात
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com