नागपूर :- दादासाहेब बालपांडे कॉलेज ऑफ फार्मसी बेसा येथे ३ दिवसीय “फार्मा युथ फेस्टीव्हल अमोघ उर्जा-२०२४” स्पर्धेतील दुसऱ्या दिवशी च्या कार्यक्रमाला सुप्रसिद्ध हास्य कलाकार गौरव मोरे हे उपस्थित होते. त्यांनी आपल्या हास्य कलेनी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे मनोरंजन केले. अंबे दुर्गा एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष मनोज बालपांडे, यांनी हास्य कलाकार गौरव मोरे यांचे सत्कार केले तसेच यावेळी व्यवस्थापक प्रतिनिधी वैशाली बालपांडे, प्राचार्या डॉ. उज्वला महाजन, डॉ. नितीन दुमोरे, कार्यक्रमाचे संयोजक डॉ. निलेश महाजन व सचिन मोरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
अमोघ उर्जा या कार्यक्रमांतर्गत दुसऱ्या दिवशी डांस स्पर्धा व वॉलीबॉल खेळाचे उपांत्य फेरीचे व अंतिम फेरीचे सामने खेळल्या गेले. डांस स्पर्धेमध्ये एकूण ३५० स्पर्धकांनी सहभाग घेतला.
वॉलीबॉल चे अंतिम सामने पी. आर. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, तळेगाव जि. वर्धा व महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, बेटाला, ब्रम्हपुरी या संघात खेळला गेला. या सामन्यात महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, बेटाला, ब्रम्हपुरी हा संघ विजयी व पी.आर. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, तळेगाव हा संघ उपविजेता ठरला.
वॉलीबॉल खेळातील पी.आर. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, तळेगाव या संघातील धनंजय वरुडे हा उत्कृष्ठ लिफ्टर व दादासाहेब बालपांडे कॉलेज ऑफ फार्मसी नागपूर या संघातील अनुराग चटप हा उत्कृष्ठ स्मॅशर्स ठरला. वॉलीबॉल चे संपूर्ण सामन्यांचे नियोजन महाविद्यालयाचे प्रा. किशोर दानव यांनी सांभाळले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर यांनी सहकार्य केले.