– वैनगंगा नावाने ब्रॅण्ड प्रसिध्द
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्त्वाकांक्षी योजना देशात महिलांना आर्थिकदृष्ट्या सबल करणे. त्यासाठी त्यांनी लखपती दिदी ही योजना सुरु केली आहे. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा,अंतर्गत महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाद्वारे ही राबविली जात आहे.
जिल्ह्यात महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान म्हणजेच उमेदचे 14 हजार 52 स्वयंसहायता महिला बचत गट असून यातील विविध महिला बचत गट आपली विविध उत्पादने तयार करतात. तर या गटांच्या महिलांनी मिळून 12 शेतकरी उत्पादक कंपन्यांची स्थापना केली आहे. या गटांशी १ लाख 56 हजार महिला 780 जुळलेल्या आहेत. यापैकी 42268 महिला या लखपती दिदी झाल्या आहेत.या जिल्हयासाठी 51 हजार 691 लखपती दीदीचा लक्षांक आहे.एकुण लक्षाकांच्या 82 टक्के महीला लखपती दीदी आहेत.
या महिला बचत गटामार्फत विविध व्यवसाय सुरू करून शेती आणि बिगर शेतीशी निगडित व्यवसायात काम करीत आहेत. कुक्कुटपालन, शेळीपालन, दुग्ध व्यवसाय, पशुखाद्य निर्मिती, डाळ मिल, डाळ बट्टी आटा तयार करणे, तेल, मसाले निर्मिती, पापड, लोणचे, सोलर ड्रायर,विणकाम, ब्युटी पार्लर,ज्यूटपासून छोट्या बॅगा बनवणे, असे व्यवसाय करत आहेत. यापैकी अनेक उत्पादने ‘उमेद मार्ट’ या ऑनलाईन मार्केटींग ॲपवर विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
प्रधानमंत्री महोदय यांच्या महत्वकांक्षी लखपती दिदी योजने अंतर्गत 82 जिल्ह्यास ७३७४१ उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यापैकी ६५ हजार ५७३ लखपती दिदी चे उद्दिष्ट साध्य करण्यात आलेले असून उर्वरित उद्दिष्ट ३१ मार्च २०२५अखेर पर्यंत पूर्ण करण्यासाठी प्रयत्न होत आहेत.
वाढला आत्मविश्वास
बचत गटाच्या चळवळीशी जोडल्या गेल्याने महिलांना आपले कर्तृत्व सिद्ध करण्याची संधी प्राप्त झाली आहे. अनेक महिलांनी अद्वितीय यश संपादन केले आहे. त्यातीलच एक उदाहरण श्रीमती उषा कावळे, यांच्या भंडार टसर सिल्क च्या एक्सपोर्ट करतात.मा.राज्यपाल यांनी त्यांच्या कामाचे कौतुक केले.
लखपती दीदी या योजनेअंतर्गत महिलांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ झालीच शिवाय समुदाय गुंतवणूक निधीच्या अंतर्गत केंद्राचा ६०% निधी आणि राज्याचा ४०% निधी वापरून उद्योग आणि व्यवसायामध्ये त्यांची भरभराट होत आहे. त्यामुळे त्यांच्या राहणीमानातही बदल झालेला दिसून येतो. विशेषतः ग्रामीण भागातील महिलांमध्ये असणारा लाजरा बुजरा स्वभाव आता बदलला असून त्याची जागा आत्मविश्वासाने घेतली आहे. या महिला आता निर्णय प्रक्रियेत सहभागी होतांना दिसत आहेत. समाजात वावरण्याचे आत्मभान उंचावतांना दिसत आहे.
भंडारा जिल्ह्यातील उमेदच्या महिलांची वैशिष्ट्यपूर्ण काम म्हणजे मोहाडी आंधळगाव येथे कोसा सिल्क येथे 42 महिला सहभागी आहेत .इथे उमेद मार्फत प्रशिक्षण दिल्या जाते. कोसा साडी,स्कार्फ, शाल व विविध कापड निर्मिती करण्यात येते .आणि याचा वैनगंगा म्हणून ब्रॅड विकसित केलेला आहे.
उमेद चौपाटी अंतर्गत सात फूड ट्रकमार्फत खवय्यांना मेजवानी महिला बचत गटांच्या महिलांमार्फत उपलब्ध करून दिली जाते. जिल्हा परिषद व सर्व पंचायत समिती परिसरात उमेदचे कॅन्टीन कार्यरत आहेत ,त्याद्वारे 26 गरजू महिलांना रोजगार मिळालेला आहे.
शंभर दिवसाच्या कृती कार्यक्रमांमध्ये सात कलमी कार्यक्रमांतर्गत जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा भंडारा येथील प्रशासकीय कार्यालय, तसेच अभ्यागतांसाठी सर्व सोयी व उत्तम व्यवस्था, स्वच्छ शौचालय ,आणि हिरकणी कक्षाच्या सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
आता दसरा मैदान येथे उमेदचा मिनी सरस विक्री व प्रदर्शन सोहळा 7 मार्चपर्यंत असून यामध्ये या उमेदच्या महिलांनी उत्पादित केलेल्या अनेक वस्तू विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत. तसेच या महिलांच्या अंगभूत कलागुणांना वाव देण्यासाठी रोज सांस्कृतिक कार्यक्रमांची देखील आयोजन करण्यात येत आहेत.
लखपती दीदी व्हाव्यात यासाठी नवनवीन प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात आले. महिलांमध्ये नवीन कौशल्ये शिकण्याची प्रवृत्ती वाढली असून विविध बचत गटाच्या लघु उद्योगांमध्ये त्यांचा सहभाग वाढला आहे. महिला एकत्र येत असून यामधून विचाराचे आदान प्रदान आणि संवादातून आर्थिक उन्नतीकडे ग्रामीण भागातील महिलांची वाटचाल होण्यासाठी लखपती दिदी ही योजना सहाय्यभूत ठरत आहे.