मनपात सोमवार ५ फेब्रुवारी रोजी “लोकशाही दिन”

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या केंद्रीय कार्यालय सिव्हिल लाईन येथे सोमवार ५ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता “लोकशाही दिनाचे” आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य शासनाच्या ३० डिसेंबर १९९९ च्या शासन निर्णयाप्रमाणे जनतेच्या तक्रारींचे निराकरण करण्याच्या दृष्टीने दर महिन्यातील पहिला सोमवार ‘लोकशाही दिन’ म्हणून आयोजित करण्यात येतो. त्यानुसार सोमवार दिनांक ५ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी १० वाजता मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृह येथे लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे.

लोकशाही दिनानिमित्त संबंधित नागरिकांनी आपल्या तक्रारींसह नियोजित वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहन नागपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात आले आहे.

NewsToday24x7

Next Post

जखमा अश्या सुंगधी झाल्यात काळजाला.... भीमराव पांचाळे यांच्या गजल मैफीलीने रसीक सुखावले

Wed Jan 31 , 2024
– महासंस्कृती महोत्सवाला सुरांची उधळण भंडारा :- रसीकांच्या कान व मनाची तृप्ती करणारे प्रख्यात गजलनवाज भीमराव पांचाळे यांचे स्वर..किशोर बळीचे तितकेच चपखल संचलन ,दाद देणारे रसीक तसेच वाहवा मिळवणारे ईलाही जमादार यांचे शेर जखमा अश्या सुंगधी झाल्यात काळजाला केलेत वार ज्याने तो मोगरा असावा.. प्रत्येक रसीक हा बोलका शायरच असतो.51 वर्ष गझलची साधना करणारे गझलगायक भीमराव पांचाळे व त्यांची कन्या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com