चैन स्नॅचिंग व दुचाकी चोरी करणारे सराईत चोरटे पोलिसांच्या ताब्यात .

नागपुर –  उपराजधानी  येथील गुन्हे शाखाच्या चैन स्नेचींग विरोधी पथकाने  मोठी कारवाई केलेली आहे . चेन स्नॅचिंग व दुचाकी चोरी करणारी सराईत गुन्हेगारांच्या टोळीला शनिवारी अटक करण्यात आली आहे. शहर व जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागात चेन स्नॅचिंग व दुचाकी चोरी यासह विविध प्रकारचे गंभीर गुन्हे करणाऱ्या चोरट्याना  गुन्हे शाखाच्या चैन स्नेचींग पथकाने बेड्या ठोकल्या आहे तसेच चोरट्यानी ६ गुन्हे केल्याचे उघडकीस आले असून पोलिसांनी त्याच्याकडून सोन्याचे दागिने व दुचाकीसह असा एकूण 1,55,000 मुद्देमाल जप्त केला आहे.

प्राप्त माहिती नुसार दि. 03.09.22 रोजी गुन्हे शाखा चैन स्नेचींग विरोधी पथकाला  मिळालेल्या खात्रीशीर माहीती वरून विधीसंघर्षग्रस्त बालक वय 17 वर्ष राहणार सुगत नगर, पो स्टे कपिल नगर यास ताब्यात घेवुन विचारपुस केली असता त्यांने पाहीजे असलेला आरोपी नामे उस्मान अकबर खान रा. कामगार नगर, कपिल नगर याचे सोबत पो.स्टे. गिट्टीखदान, मानकापुर हद्दीत चैन स्नेचींगचा गुन्हा केल्याचे तसेच पो.स्टे. कळमना व यशोधरानगर हद्दीत वाहन चोरीचे गुन्हा केल्याची कबुली दिली. आरोपींना सोन्याचे दागीने गहान ठेवण्या करीता मदत करणारा मोहमद सलीम मोहमद रशीद वय 28 वर्षे राहणार कासाबापूर, मोमीनपुरा, तहसील याने मदत केल्याने त्यास अटक करण्यात आली. आरोपी व विधी संघर्श ग्रस्त बालका कडुन 1) एक सोन्याची 11 ग्रॅम चैन की. 55000 रू 2) एक सोन्याची 06 ग्रॅम चैन की 30000 रू 3) एक काळ्या रंगाची स्प्लेंडर की 35000 रु 4) लाल रंगाची होंडा एक्टिवा दुचाकी किंमत 35000 रू असा एकूण 1,55,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सदर कारवाई  नागपूर शहराचे अपर पोलीस आयुक्त नविनचंद्र रेड्डी, पोलीस उप आयुक्त डिटेक्षन  चिन्मय पंडीत, सहाय्यक पोलीस आयुक्त रोशन पंडीत, यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि सचिन यादव, सफौ. राजेश  लोही, पोहवा अजय रोडे, नापोअं अमोल जासुद, संतोश गुप्ता, पोअं मनिश बुरडे, संदीप पडोळे यांनी केली आहे.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com