नागपूर :- अखिल भारतीय गढेवाल कोष्टी समाज विकास समितीच्या वतीने पत्रकार परिषद संबोधित करतेवेळी अध्यक्ष बालकदास हेडाऊ यांनी आपल्या समाजाच्या वतीने विदर्भातील संपूर्ण काँग्रेसच्या उमेदवारांना समर्थन जाहीर केलेले आहे.
मागण्या :
1) महाराष्ट्र शासन एसबीसी कॅटेगिरी मध्ये 45 जातीचा समावेश केला आहे व त्यांना 2 प्रतिशत आरक्षण दिलेले आहे. परंतु समाज मोठा असल्यामुळे दोन प्रशिक्षित भागात नाही म्हणून 9 प्रतिशत आरक्षण देण्यात यावे.
2) महाराष्ट्र राज्य जातीनिहाय जनगणना करावी
3 ) 50 प्रतिशत मर्यादा वाढवावी व एसबीसी जातीचा समावेश करावा.
4) सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, राजनीति च्या आधारावर केंद्र सरकारने आरक्षण द्यावे. अशी मागणी बालकदास हेडाऊ यांनी समाजाच्या वतीने केली आहे.
यावेळी समाज बांधवांची उपस्थिती होती. दुसरी गोष्ट पत्रकारांना सांगण्यात आले की, गढेवाल समाजाची जाती गणना करावी. कारण आमचा समाज मध्यनागपूर येथे 30000 हजार लोकसंख्येत आहे. आणि पूर्ण देशात दोन करोड गढेवाल कोष्टी समाज आहे. असे सांगितले. विशेष म्हणजे जाती गणना करायलाच पाहिजे अशी मागणी केलेली आहे. यावेळी बालकदास हेडाऊ, जगन सोनकुसरे, आशिष डेकाटे, जगराम हेडाऊ, महादेवराव गोखले,आणि यशवंत बुरडे यांची उपस्थिती होती.