बसची उडाण पुलाच्या सुरक्षा भिंतीला धडक लागुन कैलास मुन चा मुत्यु..

संदीप कांबळे विशेष प्रतिनिधी

कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत नागपुर जबलपुर महामार्गा वरील डुमरी रेल्वे स्टेशन येथील उडाण पुला च्या सुरक्षा भिंतीला बस चालकाच्या निष्काळजी पणा ने चालवुन धडक लागल्याने झालेल्या अपघातात बस मधिल कैलास मुन हे गंभीर जख्मी होऊन त्यांचा मुत्यु झाल्याने बस चालका विरूध्द कन्हान पोस्टे ला गुन्हा दाखल करण्यात आला.

कवी कुलगुरु कालीदास संस्कृत विद्यापीठ राम टेक येथिल कर्मचा-यास येण्या-जाण्या करीता विद्यापि ठ तर्फे मागील २ वर्षापासुन कॉट्रॅक्ट बेस वर एक ४० सीट बस एम एच ४० – सी डी – ०६९२ ही लावलेली आहे. त्या बस मध्ये दररोज ३२ कर्मचारी विद्यापिठात नागपुर ते रामटेक येणे जाणे करतात. शुक्रवार (दि.११ ) ला दररोज प्रमाणे सकाळी ८.३० वाजता. सर्व कर्म चारी नागपुर वरून रामटेक ला जात असता सकाळी ९.४० वाजता दरम्यान नागपुर जबलपुर राष्ट्रीय चार पदरी महामार्गा वरील डुमरी रेल्वे स्टेशन येथील उडाण पुलावर चालकाचे अचानक बसचे नियंत्रण सुटल्याने बसची उडाण पुलाच्या सुरक्षा भिंतीला धडक लागुन बस चे व्दार उघडुन आत बसलेले विद्यापिठाचे कर्म चारी श्री कैलास विनायक मुन वय ५७ वर्ष राह. ओम कार नगर नागपुर हे बसच्या खाली सुरक्षा भिंतीवर पडल्याने त्यांच्या छातीला व उजव्या हाताला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना उपचाराकरीता खाजगी वाह नाने किमया रुग्णालय रामटेक येथे दाखल केले. तेथे प्रथमोपचार केल्यावर डॉक्टरानी पुढील उपचारार्थ मेडीकल कॉलेज नागपुर येथे पाठविल्याने आकस्मिक विभागात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. बस चालक बनवारीलाल सोनवाने वय ६५ वर्ष राह. रानी दुर्गावती चौक नागपुर हे कैलास मुन च्या मुत्यु ला कारणीभुत असल्याने कवी कुलगुरु काली दास संस्कृत विद्यापीठ रामटेक चे सहायक कुल सचिव श्री राजेंद्र धाडुजी मेश्राम वय ५४ वर्ष यांच्या फिर्यादीने कन्हान पोलीसानी पोस्टे ला बस चालक बनवारीलाल सोनवाने यांचे विरूध्द गुन्हा दाखल करून पुढील तपास कन्हान पोलीस करित आहे .

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

गोसेखुर्द प्रकल्प पूर्ण करण्यासाठी शासनाचे सर्वतोपरी प्रयत्न  - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 

Sat Nov 12 , 2022
· विदर्भाचा कायापालट घडवण्याची प्रकल्पात क्षमता · पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्याचे व्यापक नियोजन भंडारा, दि. 12 :-  गोसेखुर्द प्रकल्पाच्या माध्यमातून रोजगाराच्या मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध होणार असून या प्रकल्पात परिसराचा कायापालट करण्याची क्षमता आहे. एक महत्त्वाचे पर्यटनस्थळ म्हणूनही गोसेखुर्दचा विकास करण्यात येत असून पर्यटन व रोजगाराच्या संधी निर्माण करणारा हा प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी शासन सर्व पातळ्यांवर प्रयत्न करणार आहे, […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
Verified by MonsterInsights