संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
– 11,17 व 18 ऑगस्ट ला नोंदणीची अखेरची संधी
कामठी :- आगामी होऊ विधानसभा निवडणुकीच्या पाश्वरभूमीवर कामठी विधानसभा मतदार संघाची प्रारूप मतदार यादी 6 ऑगस्ट ला प्रसिद्ध करण्यात आले असून ही प्रारूप मतदार यादी राजकीय पक्षापासून ते सामान्य नागरिकांपर्यंत खुल्या असून आगामी विधानसभा निवडणुकीत एकही मतदार मतदानापासून वंचीत न राहावे यासाठी नागरिकांनी या प्रारूप मतदार आपापल्या नावाची तपासणी करून खातरजमा करावी असे आवाहन कामठी चे तहसिलदार गणेश जगदाडे यांनी आज 10 ऑगस्ट ला कामठी विधानसभा मतदार संघात रांबविण्यात आलेल्या विशेष नोंदणी शिबिरात व्यक्त केले. तसेच 11 ,17 व 18 ऑगस्ट ही नोंदणीची अखेरची संधी असल्याचे सुद्धा सांगितले.
कामठी मौदा उपविभागीय अधिकारी सचिन गोसावी यांच्या आदेशानुसार कामठी तहसील निवडणूक नायब तहसिलदार मयूर चौधरी यांचे विशेष पथक तयार करीत कामठी विधानसभा मतदार संघातील एकूण 524 मतदान केंद्रावर भेटी देत मतदान केंद्राची पाहणी करीत संबंधित मतदान केंद्रावरील नियुक्त केलेले बीएलओ व पर्यवेक्षक यांच्या साहाय्याने विधानसभा मतदार संघात विशेष नोंदणी शिबीर राबविण्यात आले.ही विशेष नोंदणी शिबिर 11 ,17 व 18 ऑगस्टला राबविण्यात येणार आहे.निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार एक जुलै 2024 या अहर्ता दिनांकावर आधारित मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यापुढे ठेवून राबविण्यात येत असून या अंतर्गत 6 ऑगस्ट ला प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.यासंदर्भात कुणाला आक्षेप असल्यास 20 ऑगस्ट पूर्वी राजकीय पक्ष किंवा सामान्य नागरिक आपला अर्ज दाखल करु शकतात .20 ऑगस्ट रोजी अर्ज स्वीकारण्याची मुदत संपणार आहे त्यानंतर सर्व अर्जाची तपासणी होऊन 30 ऑगस्ट रोजी अंतिम मतदार यादी प्रकाशित केली जाणार आहे आणि या मतदार यादीच्या आधारावरच आगामी कामठी विधानसभा निवडणुकीचे मतदान घेण्यात येणार आहे.
मतदानाच्या दिवशी आपले नाव मतदान यादीमध्ये नाही, मयत,मृतकांची नावे आहेत अशा तक्रारी वारंवार करण्यात येतात मात्र मतदानाच्या पूर्वी निवडणूक विभागामार्फत ज्या मतदार याद्या तयार होतात त्याबाबत राजकीय पक्ष तसेच सामान्य नागरिकांनी जागरूकपणे लक्ष वेधने आवश्यक आहे त्यानुसार प्रसिद्ध प्रारूप मतदार यादीवर कुणाला आक्षेप असल्यास 20 ऑगस्ट पर्यंत आक्षेप नोंदवून लाभ घ्यावा .तसेच प्रारूप मतदार यादीत काही बदल हवे असल्यास नमुना फॉर्म 6,7,8 भरण्याची सुविधा आहे त्यानुसार फॉर्म 6 भरून मतदार यादीमध्ये नव्याने नाव समाविष्ट करता येते.फॉर्म 7 भरून यादीतून नाव वगळता येते तसेच फॉर्म क्र 8 भरून मतदार यादीतील नावाची दुरुस्ती व अन्य बाबी करता येतात अशी माहिती तहसिलदार गणेश जगदाडे व नायब तहसीलदार मयूर चौधरी यांनी केली आहे.