लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कामठी पंचायत समितीच्या अधिकारी,कर्मचाऱ्यांची मतदान जनजागृती रॅली

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

– कामठी पंचायत समिति कामठी अधिकारी/कर्मचारी यांचे मतदान वाढीसाठी रॅलि व पथनाट्य

कामठी :- कामठी विधानसभा मतदार संघात मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी आज 20 मार्च ला कामठी पंचायत समितीच्या समस्त अधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्वीप कार्यक्रमा अंतर्गत कामठी पंचायत समिती कार्यालय ते तहसिल कार्यालय पर्यंत मतदान जनजागृती विषयी घोषणा देत मतदान जनजागृती रॅलि काढण्यात आली.

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 मध्ये मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी कामठी पंचायत समितीच्या वतीने मतदान जनजागृती रॅली काढुन तहसिल कार्यालय व सरस्वती विद्यालय कामठी जवळ दोन ठिकाणी पथनात्याचे सादरीकरण केले.यावेळी नागरिकांनी चांगलीच गर्दी केली होती.या रॅली व पथनाट्याने शहर वासीयांचे लक्ष वेधून घेतले होते.

सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सचिन गोसावी, तहसिलदार गणेश जगदाळे,गटविकास अधिकारी प्रदीप गायगोले ,नोडल अधिकारी.संदिप बोरकर, गटशिक्षण अधिकारी संगिता तभाने,या सर्व सहाय्यक मतदार नोंदणी अधिकाऱ्यांच्या सहकार्याने कामठी विधानसभा मतदार संघातील कामठी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या ज्या मतदार क्षेत्रात ५०% पेक्षा कमी मतदान झाले होते,अश्या क्षेत्रात पथनाट्य,रॅलि,निबंध स्पर्धा,चित्रकला स्पर्धा घेण्याचे आदेश सर्व शाळांना देण्यात आले होते.परंतु सर्वांना आदेश देणारे अधिकारी मागे नसुन त्यांनी स्वत: पथनाट्य ,रॅलि काढुन मतदान वाढीसाठी प्रयत्न केलेला आहे.

पंचायत समिती कामठी एकमेव कार्यालय आहे ज्यांनी ईतरांना काम करा सांगुन थाबले नाहीत.तर स्वत: पथनाट्याद्वारे आव्हान केले आहे.या उपक्रमात जनतेकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.तर या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत नागरिकांनी जास्तीत जास्त मतदान करून आपला मतदानाचा हक्क बजवावा असे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात येत असल्याचे मौलिक मत गटविकास अधिकारी प्रदीप गायगोले, गटशिक्षणाधिकारी संगीता तभाणे यांनी मिरवणूकित व्यक्त केले.

या उपक्रमात कनिष्ठ प्रशासन अधिकारी अक्षय मंगरुळकर, विस्तार अधिकारी .मनिष दिघाडे, शितल तिजारे,कुंदा चंदनबावने,वैशाली टेकाम,वेदिता नेवारे,मनिषा उघडे,राजश्री कांबळे,रत्ना वडकी,संयुक्ता अवथे,अनुजा पाठक,प्रमिला तिरपुडे, नंदा बुगेवार ,भुषण अरमरकर,संजय परमाल,रवि नन्होरे, राजेश गेडाम,वैभव सरमखे,किशोर खुबाळकर,विनायक शेंद्रे,मारोती बोरकर,लोनेश्वर देशमुख,अभय चांदुरकर,असे एकुण ३५ अधिकारी/कर्मचारी सहभागी होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

बहुजन रिपब्लिकन एकता मंच तर्फे विकास पुरुष नितीन गडकरी यांचे कले अभिनंदन..

Wed Mar 20 , 2024
संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी  -बहुजन रिपब्लिकन एकता मंच पूर्ण ताकदीने विकास पुरुष नितीन गडकरी यांच्या पाठीशी-ऍड सुलेखाताई कुंभारे कामठी ता प्र 20:-नागपूर लोकसभा मतदार संघातून केंद्रिय मंत्री ना नितीन गडकरी यांची उमेदवारी जाहीर झाल्याबद्दल बहुजन रिपब्लिकन एकता मंचच्या संयोजिका ऍड सुलेखाताई कुंभारे व बहुजन रिपब्लिकन एकता मंचच्या नागपूर शहरातील पदाधिकाऱ्यांनी नितीन गडकरी यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देत अभिनंदनाचा वर्षाव केला.याप्रसंगी नागपूर […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com