वडसा येथे पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार व स्वयंरोजगार मेळाव्याचे आयोजन

गडचिरोली :- औद्योगिक प्रशिक्षण संस्था, वडसा आणि जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मॉडेल करिअर सेंटर, गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 26 मे 2023 रोजी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, वडसा येथे ठिक 10.00 वाजता पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार व स्वयंरोजगार मेळावा आयोजित करण्यांत आलेला आहे.

सदर रोजगार मेळाव्यामध्ये नामांकित कंपन्या, महामंडळे उपस्थित असणार असून उमेदवारांना रोजगार व स्वयंरोजगाराचा लाभ घेण्यासाठी‍ सदर रोजगार मेळाव्याकरिता असलेले ईच्छूक उमेदवारांनी स्वत:चा बायोडाटा, आधार कार्ड, शैक्षणिक प्रमाणपत्रांच्या झेराक्स सह स्वखर्चाने, दि.26 मे 2023 रोजी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, वडसा येथे उपस्थित राहून रोजगार मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, गडचिरोली या कार्यालयाने आवाहन केले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर मेळाव्याचे आयोजन

Tue May 23 , 2023
गडचिरोली : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था देसाईगंज, जि. गडचिरोली येथे शुक्रवार दि. 26 मे 2023 रोजी सकाळी 10 वाजता “छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर मेळाव्याचे” आयोजन करण्यात आलेले आहे. सदर मेळाव्याचे उद्घाटन आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे यांच्या हस्ते होणार आहे. याप्रसंगी प्रमुख अतिथि म्हणून जे. पी. लोंढे उपविभागीय अधिकारी देसाईगंज, डॉ. कुलभूषण रामटेके मुख्याधिकारी नगरपरिषद देसाईगंज, किरण एच. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com