नागपूर :- राष्ट्रीय अध्यक्ष नारायणराव बागडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने उद्धव तायडे बोलले या राजकारणाचा भाऊ गर्दीत सामान्य कार्यकर्ता कोणत्या कोपऱ्यात बसला असेल याची जाण तर सोडाच हे तर फारच दूरची गोष्ट आहे इथे तर जवळ असलेल्यांच्या कोणी वाली नाही परंतु मी एक असा चमत्कार बघितलाय एक सामान्य कार्यकर्ता जेव्हा जिद्द, चिकाटी, आणि तळमळ करतो तो पण समाजाची धुरा समर्थपणे सांभाळू शकतो इतक्यी शक्ती संविधानाने दिलेल्या लोकशाहित आहे जर संविधान नाही असते तर आजा, बाप, पोरगं, नातू आणि पड नातु यांचीच समाजावर मक्तेदारी असती हि पंरपरा बागडेनी उफाळून फेकून दिली असे प्रतिपादन आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चा चे राष्ट्रीय महासचिव उद्धव तायडे यांनी केले ते आंरिमोचे राष्ट्रीय अध्यक्ष नारायण बागडे यांच्या वाढदिवसानिमित्त संविधान सन्मान दिवस म्हणून साजरा करतांना बागडे यांच्या निवासस्थानी सैनिक कुटी येथे सत्कारा प्रसंगी बोलत होते.
कार्यक्रमात प्रामुख्याने आंरिमो चे राष्ट्रीय संघटक देवेंद्र बागडे, जेष्ठ नेते सुखदेव मेश्राम, अनिल बनसोडे, प्रविण आवळे, प्रा.रमेश दुपारे, राजु कांबळे, सुभाष हाडके, प्रफुल्ल इंगोले, जयदेव चिंवडे मोठे बंधू सुनील बागडे, शालिक बांगर उपस्थित होते. बागडे यांच्या वाढदिवसानिमित्त देशासह राज्यातील विदर्भ, मराठवाडा, खानदेश, पच्छिम महाराष्ट्र, मुंबई कोकण, उत्तर महाराष्ट्रातुन चळवळीतील कार्यकर्त्यांनी शुभेच्छांच्या वर्षाव केला. याप्रसंगी बागडे यांनी देशातील तमाम महिला, पुरुष, युवा, कामगार, विध्यार्थी, यांनी शुभेच्छा दिल्याबद्दल सर्वांचे आभार मानले व संविधानाच्या रक्षणासाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करावा लागेल यासाठी सज्ज राहा हा संदेश दिला.