क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेचा निधी वेळेत वितरीत करावा – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

मुंबई :- क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेचा निधी लाभार्थींना निर्धारित वेळेत वितरीत करण्याचे निर्देश महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले.

मंत्रालय दालन येथे आढावा बैठकीत मंत्री आदिती तटकरे बोलत होत्या. यावेळी महिला व बालविकास विभागाचे सचिव अनुपकुमार यादव, सहसचिव अहिरे, उपसचिव वि.रा.ठाकूर, सहसचिव स्मिता निवतकर, महिला व बालविकास आयुक्तालयाचे उपायुक्त राहुल मोरे उपस्थित होते.

मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना ही शून्य ते १८ वयोगटातील अनाथ, निराधार, निराश्रीत, बेघर, संरक्षण व निवाऱ्याची गरज असलेल्या मुला-मुलींना संस्थाबाह्य कौटुंबिक वातावरणात संगोपन व्हावे त्यांना मुलभूत सुविधा मिळाव्यात व त्यांचा विकास व्हावा यासाठी राबविण्यात येते. प्रतिलाभार्थी व संस्थांना देण्यात येणारा निधी वेळेत वितरीत करावे तसेच आगामी कालावधीकरिता निधीची मागणी वेळेत सादर करावी, असे आदेश मंत्री तटकरे यांनी दिले.

मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या, ईरशाळवाडी या दरडग्रस्त आपत्तीतील बाधित अनाथ मुलांना आवश्यक ती सर्व मदत व सहाय्य विभागाकडून करावी. अंगणवाडी केंद्रात जाणारी बालके, शाळेत जाणारी बालके, शून्य ते १८ वयोगटातील मुलांची स्थिती तपासून विभागाच्या अनुषंगाने योग्य ती कार्यवाही करावी. यामध्ये पात्र लाभार्थींना बालसंगोपन योजनेचा लाभदेखील वेळेत वितरीत करावा. दुर्घटनेतील बालकांना आवश्यकता पाहून वेळोवेळी समपुदेशन देखील करण्यात यावे. महिला व बाल विकास विभागातंर्गत विविध समित्यांची स्थापना करून याचा नियमित कामकाज आढावा घेण्याचे निर्देश मंत्री तटकरे यांनी यावेळी दिले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

ब्राझीलच्या शिष्टमंडळाने घेतली कृषीमंत्री धनंजय मुंडे यांची भेट

Tue Sep 26 , 2023
– महाराष्ट्र आणि ब्राझील दरम्यान सोयाबीन, कापूस, ऊस आदींच्या संशोधन व व्यापारासंदर्भात झाली चर्चा मुंबई :- ब्राझीलच्या राजकीय दूतावासामार्फत ब्राझील सरकारमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांची आज मुंबई येथे भेट घेऊन कृषी, कृषी व्यापार व गुंतवणूक आदी विषयांवर चर्चा केली. यावेळी ब्राझीलच्या शिष्टमंडळाने मंत्री धनंजय मुंडे यांना ब्राझील भेटीचे निमंत्रण दिले. कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी ब्राझीलच्या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com