लव्ह जिहाद थांबवण्यासाठी कठोर कायद्याची अंमलबजावणी करा

नागपूर :- नागपूर येथे नुकत्याच घडलेल्या घटनेत बी.एस.सी.मध्ये शिक्षण घेत असलेल्या एका तरुणीला अशा प्रकारे फसवले गेले. आरोपीने खोट्या ओळखीचा वापर करून ती मुलगी फसवली, तिचा धर्मांतर करून तिच्यावर निकाह लादला. या घटनेमुळे तिच्या कुटुंबाला धमक्या दिल्या जात आहेत, आणि ती मुलगी मानसिक त्रास सहन करत आहे. हा आरोपी एका झोपडपट्टीतील झोपडी मध्ये रहिवासास असून त्याच्या घरात स्वयंपाक न शिजवता इतरत्र घरातून अन्न दिले जात असून त्यात अनुचित प्रकार केले जात असल्याचे नाकारू शकत नाही.

अशा घटनांचा तपास होऊन आरोपींवर कठोर कारवाई केली गेली पाहिजे. लव्ह जिहादसारख्या घटनांवर अंकुश ठेवण्यासाठी स्वतंत्र आणि कठोर कायदा आणणे गरजेचे आहे, ज्यामुळे अशा प्रकारांमध्ये सहभागी असलेल्या व्यक्तींवर त्वरित कारवाई होईल. समाजातील तरुण-तरुणींना अशा फसवणुकीबद्दल जागरूक करण्यासाठी शाळा, महाविद्यालये आणि समाजमाध्यमांद्वारे मोठ्या प्रमाणावर जनजागृती अभियान राबवले पाहिजे. अशा घटनांमध्ये दोषींना शिक्षा मिळावी, आणि पीडितेला संरक्षण द्यावे अशी विनंती.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

पानपिंपरी या पिकाला शेती पिकाचा दर्जा द्यावा - आमदार दटके

Fri Dec 20 , 2024
नागपूर :-  राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चेदरम्यान आमदार प्रवीण दटके यांनी विविध मुद्दे उपस्थित केले. नागपुर – यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सदर मागणी मान्य करत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवड कार्यक्रम 2024- 25 मधील प्रस्तावित आर्थिक सुधारित मापदंड तयार केले आहेत त्यात पान पिंपरी चा समावेश करत असल्याचे जाहीर केले. मागणी पूर्ण केल्याबद्दल  दटके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!