विभागीय लोकशाही दिनात दोन तक्रारी प्राप्त

Ø तक्रार अर्ज तातडीने निकाली काढण्याचे विभागीय आयुक्तांचे आदेश

नागपूर :- विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित लोकशाही दिनात आज दोन तक्रार अर्ज प्राप्त झाले असून संबंधीत तक्रारी तातडीने निकाली काढण्याचे आदेश विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी दिले आहेत.

बिदरी यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले. यावेळी सामान्य प्रशासन उपायुक्त प्रदीप कुलकर्णी, संबंधीत विभाग प्रमुख यावेळी उपस्थित होते. तक्रारदारांकडून बिदरी यांनी तक्रारी जाणून घेतल्या. पुढील कार्यवाहीबाबत तक्रारदारांना मार्गदर्शन केले. या दोन्ही तक्रार अर्जांवर तातडीने कार्यवाही करुन हे प्रकरणे निकाली काढण्याचे आदेश बिदरी यांनी संबंधीत विभागांना दिले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मुंबईकरांच्या सुखकर प्रवासाबरोबरच प्रदूषणमुक्तीचे उद्दिष्ट साध्य करणार - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Mon Mar 11 , 2024
मुंबई :- सर्वसामान्य मुंबईकरांचा प्रवास सुखकर होण्याबरोबरच वेळेची आणि इंधनाची बचत करणारे तसेच प्रदूषणमुक्त मुंबई करण्याचे शासनाचे उद्दिष्ट साध्य करणारे प्रकल्प उभारण्यात येत आहेत. इंजिनिअरिंगचा चमत्कार असणारा किनारी रस्ता हा या अनुषंगाने उपयुक्त प्रकल्प असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. प्रियदर्शनी पार्क आणि रेसकोर्सच्या उपलब्ध होणाऱ्या 300 एकर जागेत अबालवृद्धांसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे सेंट्रल पार्क उभारण्यात येणार असून मुंबईकरांसाठी हे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com