नागपूर :- केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. नितीन गडकरी यांचे उत्तर नागपुरातील लोकसंवाद यात्रेत जागोजागी जल्लोषात स्वागत झाले. घोषणा, फुलांचा वर्षाव आणि ढोल-ताशाच्या गजरात कार्यकर्त्यांच्या उदंड उत्साहाचा पूर या यात्रेमध्ये अनुभवाला आला.
ना. नितीन गडकरी यांची लोकसंवाद यात्रा आज (सोमवार) उत्तर नागपुरात आयोजित करण्यात आली. वैशाली नगर येथील भाजपाच्या कार्यालयापासून यात्रेला प्रारंभ झाला. त्यानंतर बाळाभाऊ पेठ, गुरुनानक पुरा, चांभार नाला, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, कमाल चौक, काश्मिरी गली, इंदोरा, जरिपटका रिंग रोड, सुगत नगर, डब्ल्यूसीएल चौक, नारी रोड, कपील नगर या मार्गाने कमठी रोडवरील टेका नाका चौकात यात्रेचा समारोप झाला.
याठिकाणी महाशक्ती दुर्गा माता मंदिरात ना.गडकरी यांनी दर्शन घेतले. यावेळी रिपब्लिकन एकता मंचच्या नेत्या माजी मंत्री सुलेखा कुंभारे, माजी आमदार डॉ. मिलिंद माने, माजी आमदार गिरीश व्यास, माजी महापौर संदीप जोशी, नागपूर महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे माजी सभापती वीरेंद्र कुकरेजा, माजी नगरसेवक प्रभाकर येवले, नवनीनतसिंग तुली, संदीप गवई, भाजयुमोचे अध्यक्ष बादल राऊत यांची प्रमुख उपस्थिती होती. तत्पूर्वी, प्रत्येक चौकात आणि वस्तीमध्ये शेकडो कार्यकर्त्यांच्या सहभागाने लोकसंवाद यात्रेची रंगत वाढवली. बौद्ध बांधवांनी अतिशय आनंदाने ना. श्री. गडकरी यांच्या लोकसंवाद यात्रेचे स्वागत केले व लोकसभा निवडणुकीतील विजयासाठी शुभेच्छा दिल्या. शीख समाजातील बांधवांनी पारंपरिक पद्धतीने स्वागत केले. रिपब्लिकन एकता मंचाचे कार्यकर्ते अतिशय उत्साहाने लोकसंवाद यात्रेमध्ये सहभागी झाले होते.
लोकसंवाद यात्रा आज दक्षिण-पश्चिममध्ये
ना. नितीन गडकरी यांची लोकसंवाद यात्रा उद्या (मंगळवार) दक्षिण-पश्चिम मतदारसंघात पोहोचणार आहे. सकाळी नऊ वाजता प्रशांतनगर (चुनाभट्टी) येथून यात्रेला प्रारंभ होईल. त्यानंतर पूर्व समर्थ नगर, चुनाभट्टी चौक, छत्रपती सभागृह, छत्रपती चौक, राजीवनगर, जयप्रकाशनगर, त्रिमूर्तीनगर चौक, खामला चिकन मार्केट, खामला मार्केट रोड, गुलमोहर हॉल, ऑरेंज सिटी चौक, प्रतापनगर, सोमलवार शाळा रोड, भेंडे ले-आऊट, इंद्रप्रस्थ नगर चौक, जयताळा बाजार चौक, विवेका हॉस्पिटल रोड, विवेकानंद स्मारक, आयटीपार्क चौक, श्रीनगर परसोडी, गोपाळनगर झेंडा चौक, माटे चौक, अभ्यंकर नगर हनुमान मंदिर, बजाजनगर, परांजपे शाळा या मार्गाने लक्ष्मीनगर येथील आठ रस्ता चौकात यात्रेचा समारोप होईल.