![](https://newstoday24x7.com/wp-content/uploads/2024/06/BJP-Half-page_page-0001.jpg)
खापरखेडा :- पोस्टे खापरखेडा येथील स्टाफ पोस्टे परिसरात पेट्रोलींग करीत असता गोपनीय माहिती मिळाली की, विना संगम येथे अवैधरीत्या रेतीची चोरटी वाहतूक होत आहे. अशा मिळालेल्या माहिती वरून नाकाबंदी करून आरोपी नामे आकाश मारुती चौधरी, वय ३० वर्ष, रा. बिना संगम हा आपल्या ताब्यातील पांढऱ्या रंगाची बोलेरो पिकअप क्र. MH 40 BL 9660 ने अवैधरीत्या चोरटी रेतीची वाहतुक करतांनी मिळुन आल्याने बोलेरो चालकास रेती वाहतुकीचा परवाना (रॉयल्टी) विचारले असता रेती वाहतुकीचा कोणताही परवाना नसल्याचे सांगीतले. आरोपीच्या ताब्यातुन अंदाजे १ ब्रास रेती किंमती ४,०००/-रु. व वाहतुक करण्या करीता वापरलेली पांढऱ्या रंगाची बोलेरो पिकअप क्र. MH 40 BL 9660 अंदाजे किंमती ३,५०,०००/- रुपये असा एकुण ३,५४,०००/- रुपयाचा मुद्देमाल अवैधरित्या विनापरवाना मिळुन आल्याने कार्यवाही करुन जप्त करण्यात आला. आरोपीचे कृत्य कलम ३७९ भा.द.वी सहकलम ४८ (७), ४८(८) महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६, सहकलम ४, २१ खाण आणी खनिज (नियमन आणी विकास) अधिनीयम १९५७, सहकलम ३ सार्वजनीक संपत्ती नुकसान प्रतिबंधक अधिनीयम १९८४ अन्वये गुन्हा नोंद केला आहे.
![](https://newstoday24x7.com/wp-content/uploads/2024/06/WhatsApp-Image-2024-06-06-at-16.46.34_c08487b5.jpg)
सदरची कार्यवाही ही पोलीस अधीक्षक नागपूर प्रमीण हर्ष ए. पोद्दार (भापोसे), अपर पोलीस अधीक्षक रमेश धुमाळ यांचे मार्गदर्शनात पोलीस स्टेशन खापरखेडा येथील ठाणेदार पोलीस निरीक्षक धनाजी जळक, पोलीस उपनिरीक्षक आरती नरोटे, पोहवा प्रफुल राठोड, शैलेश यादव, पोना राजू भोयर, मुकेश वाघाडे, पोशि राजकुमार सातुर यांनी पार पाडली. पुढील तपास मपोहवा कविता गोंडाणे या करीत आहे.