अवैध रेतीची चोरटी वाहतुक करणाऱ्या आरोपीविरूद्ध कारवाई वाहनासह एकूण ३,५४,०००/- रूपयाचा मुद्देमाल जप्त

खापरखेडा :- पोस्टे खापरखेडा येथील स्टाफ पोस्टे परिसरात पेट्रोलींग करीत असता गोपनीय माहिती मिळाली की, विना संगम येथे अवैधरीत्या रेतीची चोरटी वाहतूक होत आहे. अशा मिळालेल्या माहिती वरून नाकाबंदी करून आरोपी नामे आकाश मारुती चौधरी, वय ३० वर्ष, रा. बिना संगम हा आपल्या ताब्यातील पांढऱ्या रंगाची बोलेरो पिकअप क्र. MH 40 BL 9660 ने अवैधरीत्या चोरटी रेतीची वाहतुक करतांनी मिळुन आल्याने बोलेरो चालकास रेती वाहतुकीचा परवाना (रॉयल्टी) विचारले असता रेती वाहतुकीचा कोणताही परवाना नसल्याचे सांगीतले. आरोपीच्या ताब्यातुन अंदाजे १ ब्रास रेती किंमती ४,०००/-रु. व वाहतुक करण्या करीता वापरलेली पांढऱ्या रंगाची बोलेरो पिकअप क्र. MH 40 BL 9660 अंदाजे किंमती ३,५०,०००/- रुपये असा एकुण ३,५४,०००/- रुपयाचा मुद्देमाल अवैधरित्या विनापरवाना मिळुन आल्याने कार्यवाही करुन जप्त करण्यात आला. आरोपीचे कृत्य कलम ३७९ भा.द.वी सहकलम ४८ (७), ४८(८) महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६, सहकलम ४, २१ खाण आणी खनिज (नियमन आणी विकास) अधिनीयम १९५७, सहकलम ३ सार्वजनीक संपत्ती नुकसान प्रतिबंधक अधिनीयम १९८४ अन्वये गुन्हा नोंद केला आहे.

सदरची कार्यवाही ही पोलीस अधीक्षक नागपूर प्रमीण हर्ष ए. पोद्दार (भापोसे), अपर पोलीस अधीक्षक रमेश धुमाळ यांचे मार्गदर्शनात पोलीस स्टेशन खापरखेडा येथील ठाणेदार पोलीस निरीक्षक धनाजी जळक, पोलीस उपनिरीक्षक आरती नरोटे, पोहवा प्रफुल राठोड, शैलेश यादव, पोना राजू भोयर, मुकेश वाघाडे, पोशि राजकुमार सातुर यांनी पार पाडली. पुढील तपास मपोहवा कविता गोंडाणे या करीत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

अवैधरित्या मोहाफूल गावठी दारूची वाहतूक करणाऱ्या आरोपीविरूद्ध कारवाई

Mon Apr 1 , 2024
खापा :-पोलीस स्टेशन खापा येथील स्टाफ हे अवैध्य धंदयावर रेड करणेकरीता पोस्टे खापा हद्दीत पेट्रोलींग करीत असतांना गुप्त बातमीदारांकडुन गोपनीय मिळालेल्या माहिती वरून आरोपी नामे जयभिम शेषराव बागडे, वय ४२ वर्ष रा. बिचवा ता. सावनेर जि नागपुर हा आपली हिरो कंपनीची मोटारसायकल क्र. एम एच ४०/सी एन ६५४६ ने अवैधरीत्या विनापरवाना दारू घेवुन येतांना दिसल्याने त्यास थांबवुन त्याचे मोटरसायकलवरील चुंबडीमध्ये […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
Verified by MonsterInsights