नागपूर :- सेलेस्टियल 2024 वार्षिक उत्सव 6 आणि 7 मार्च 2024 रोजी अंजुमन अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालयात झाला, वार्षिकोस्तोव चे उद्घाटन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. अब्दुल शकील सत्तार, अध्यक्ष, गवर्निंग बॉडी एसीईटी चे अध्यक्ष यांच्या हस्ते झाले तन्वीर मिर्झा, अध्यक्ष, महाविद्यालय विकास समिती, एसीईटी, डॉ. मोहम्मद सोहेल परवेझ, प्राचार्य (ऑफिशिएटिंग), एसीईटी, डॉ. अहमद सज्जाद खान, उप- प्राचार्य, प्रा.एस.एम.अली, डीन, विभाग प्रमुख आणि सेलेस्टियल संयोजक डॉ.कीर्ती खंडेलवाल, सह-संयोजक डॉ.एम.एन. नसीम, डॉ.जमीर खान आदी मान्यवर उपस्थित होते.
सेलेस्टियल 24 हा कॉलेजचा दोन दिवसांचा उत्सव आहे ज्यामध्ये विद्यार्थ्यांना विचार करण्याची, वाढण्याची आणि त्यांची प्रतिभा दाखवण्याची संधी देणारी विविध कार्यक्रमांचा समावेश आहे. दोन दिवसीय वार्षिक मेळाव्यात विविध कार्यक्रम आणि उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते ज्यामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी विविध प्रकारात सहभाग घेतला होता. दोन दिवसीय उत्सवाचा एक भाग म्हणून 6 मार्च 2024 रोजी सकाळच्या सत्रात सर्वोत्कृष्ट विद्यार्थी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. 6 मार्च 2024 रोजी दुपारी पारितोषिक वितरण समारंभ आयोजित करण्यात आला होता. शैक्षणिक, क्रीडा आणि इतर सह-अभ्यासक्रमात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. पुरस्कार वितरण समारंभास प्रमुख पाहुणे तन्वीर मिर्झा, अध्यक्ष, महाविद्यालय विकास समिती एसीईटी, विशेष अतिथी म्हणून अधिवक्ता दाऊद खान संचालक इंडियन मुस्लिम चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीचे यांची प्रमुख उपस्थिती होती. सायंकाळी संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 7 मार्च 2024 रोजी एका भव्य फ्रेशर्स फंक्शनचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात बी.टेक. प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी विविध नृत्य, गाणी, कविता, रॅम्प वॉक आदी सादरीकरण केले. डॉ. अर्चना जुमले. तीरोगतज्ज्ञ आणि DSV मेडिको दिवाच्या ब्रँड अम्बेसेडर आणि श्रीमती अनुरीता ढोलकिया, उद्योजक, मिसेस ग्लोबल युनिव्हर्स 2019 या कार्यक्रमाचे परीक्षक होते. लक्षदीप कांबळे यांना मिस्टर फ्रेशर म्हणून घोषित करण्यात आले आणि मिस तनिष्का वाणी हिला एसीईटी चे कॉलेज डेव्हलपमेंट कमिटीचे अध्यक्ष श्री तनवीर मिर्झा आणि प्राचार्य डॉ मोहम्मद सोहेल परवेझ यांच्या हस्ते मिस फ्रेशरचा मुकुट देण्यात आला. अंजुमन कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगच्या च्या फैकल्टीज ज्यांना यावर्षी पि.एच.डी. मिळाली त्यांना सुद्धा सम्मानित करण्यात आले.
विद्यार्थ्यांनी सादर केलेली विविध नाटके आणि एकल गाणी आणि कव्वालीच्या माध्यमातून सांस्कृतिक कार्यक्रमाची सांगता झाली.
डॉ.अब्दुल शकील सत्तार, गव्हर्निंग बॉडी एसीईटीचे अध्यक्ष, विविध अंजुमन शाळा आणि महाविद्यालयांचे सर्व मुख्याध्यापक उपस्थित होते. अंजुमन हामी ए इस्लामचे प्रशासक, मुंबई उच्च न्यायालयाचे (निवृत्त न्यायाधीश) जेड.ए हक यांनी अशा अप्रतिम कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल सेलेस्टियल 2024 च्या संपूर्ण टीमचे अभिनंदन केले यानंतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, पाहणे व विद्याथ्यर्थ्यांसाठी भोजनाचे आयोजन करण्यात आले होते.