इलेक्ट्रिक खांबावरून पडल्याने ठेकेदार कामगाराचा मृत्यू..

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी

कामठी ता प्र 4 :-अरोली पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या धनी या गावात इलेक्ट्रिक खांब सरळ करण्याचे व तार लावण्याचे काम सुरू असताना अचानक इलेक्ट्रिक कार लावण्याचे काम करण्याकरता इलेक्ट्रिक खांबावर चढलेल्या धनराज सहदेव समर्थ वय 35 वर्षे मुक्काम गोसावी मांगली यांचा पाय घसरल्यामुळे ते खांबावरून खाली पडले व जागीच मृत्यू झाला. त्यावेळी विद्युत वितरण कंपनीचे इंजिनिअर सोनटक्के व ठेकेदार कंपनीचे मालक तथा अन्य कामगार जागेवरच उपस्थित होते. धनराज ला उपस्थित लोकांनी कामठी येथील खाजगी रुग्णालयात इलाज करता नेण्यात आले परंतु डॉक्टरांनी त्यांना तपासांती मृत घोषित केले. घटनेची माहिती अरोली पोलीस स्टेशनला मिळताच अरोली पोलीस स्टेशनचे अधिकारी जागेवर येऊन पंचनामा केला व पोस्टमार्टम करण्यात आले. सांगितले जाते की मौदा तालुक्यात दोन दिवसांपूर्वी अचानक आलेल्या तेज हवा व जोरदार पावसामुळे तालुक्यातील पाच-सहा गावांमध्ये भारी हा हा कार माजला होता. त्यामुळेच इलेक्ट्रिक खांब झुकले होते कुठे पडले होते तर कुठे इलेक्ट्रिक खांबांच्या तारा वाकलेल्या होत्या त्या दुरुस्त करण्याचे काम सुरू होते व हे काम एलिकॉन इंजिनिअरिंग कंपनीद्वारे करण्यात येत होते. धनराज या कंपनीसोबत मागील दहा वर्षापासून काम करत होता.धनराजच्या अचानक झालेल्या मृत्यूमुळे त्याच्या परिवारामध्ये हळू माजलेली असून त्याच्या मागे असलेली त्याची पत्नी एक एक वर्षाचा मुलगा व तीन वर्षाची मुलगी असा आता परिवार आहे त्या मृतकाच्या परिवाराला 50 लाखाची मदत करण्यात यावी अशी मागणी गावातील नागरिकांनी विद्युत वितरण कंपनी व इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर कंपनीला करावी केलेली आहे.

Next Post

सुलोचना दिदी यांच्या निधनाबद्दल राज्यपालांना दुःख

Mon Jun 5 , 2023
मुंबई :-राज्यपाल रमेश बैस यांनी ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दीदी यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे. सुलोचना दिदी प्रेमळ आईचे प्रतिरुप होत्या. आपल्या सशक्त अभिनयाने त्यांनी अनेक भूमिका अजरामर केल्या. पडद्यावर आणि पडद्याबाहेर देखील त्या सुहृद व्यक्ती होत्या. त्यांच्या स्मृतींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो व आपल्या शोकसंवेदना त्यांच्या आप्तेष्टांना कळवतो, असे राज्यपाल बैस यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.  

You May Like

Latest News

The Latest News

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com