संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- कामठी शहरातील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते महेश भारूका व आशा भारूका यांच्या दातृत्वातून छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून कामठी तालुक्यातील आजनी गावातील जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडीतील सर्व विद्यार्थ्यांना सोमवार दिनांक २६ जून २०२३ रोजी गावातील हनुमान देवस्थान हॉलमध्ये शालेय साहित्य वितरित करण्यात आले.
प्रमुख अतिथींच्या हस्ते दीप प्रज्वलन करून व थोर पुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. हे गाव माझे कुटुंब असून यासाठी काहीतरी सेवा करण्याची संधी मला मिळाली, असे बोल अध्यक्षीय भाषणात बोलतांना महेश भारूका यांनी व्यक्त केले.
या शालेय साहित्यात शालेय बॅग, वॉटर बॅग, टिफीन बॉक्स, व इतर शालेय साहित्यासह खाऊ सुद्धा वितरित करण्यात आला. त्यांच्या या दातृत्वाबद्दल त्यांचा मोतीराम इंगोले व माजी सरपंच माला इंगोले यांच्या हस्ते सहपत्नी शाल,श्रीफळ व बेलवृक्ष देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांनी गावातील सावित्रीबाई जोतीराव फुले अभ्यासिका आणि वाचनालयास सुद्धा आर्थिक मदत केली. आयोजनासाठी मोतीराम इंगोले यांचे योगदान मोठे आहे.
या कार्यक्रमाला जिल्हा परिषद शाळेतील आंडे, सावरकर , बुंदेले, करुणा ढोक या शिक्षक गणा सोबत अंगणवाडीतील शिक्षिका उपस्थित होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून मोतीराम विघे, प्रभाकर देशमुख, संपत पारेकर, भय्यालाल चमेले, जगदीश साहू, श्रीकांत गिऱ्हे अस्मिता बनसोड, तसेच ग्राम पंचायत सदस्य श्वेता चौधरी, हेमलता उकेबोंदरे, गायत्री हरणे, गणपत झलके, शंकर भोयर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अनिकेत इंगोले, सुनील विघे, नितीन ढोले, सचिन ढोले, अविनाश मेश्राम, गजानन गोमकार, अंकित कडू, आकाश विघे, सचिन हेटे, अनिकेत हेटे, लक्की खंडाळे, निखिल विघे, शुभम घोडे, गौरव वीघे, स्वप्नील घुले, राम वानखेडे, सृष्टी दवंडे यांनी विशेष सहकार्य घेतले.
प्रास्ताविक ग्राम पंचायत सदस्य अनिकेत इंगोले यांनी केले तर संचालन लिलाधर दवंडे यांनी केले.